Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बीडमध्ये आदिवासी महिलेला केले विवस्त्र

भाजप आमदार सुरेश धसांसह तिघांविरोधात अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा

बीड ः जमिनीवर ताबा घेण्याच्या उद्देशाने एका आदिवासी महिलेला विवस्त्र करून तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना वाळुंज (ता.आष्टी ) येथे उघडकीस आली

बीड जिल्हा निष्ठेच्याच पाठी-आ.संदीप क्षीरसागर
अजित पवारांसह 9 आमदारांचे निलंबन
देवस्थान सुशोभीकरणास चार कोटीचा निधी मंजूर

बीड ः जमिनीवर ताबा घेण्याच्या उद्देशाने एका आदिवासी महिलेला विवस्त्र करून तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना वाळुंज (ता.आष्टी ) येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणात विधान परिषदेचे भाजप आमदार सुरेश धस यांच्या पत्नी प्राजक्ता धस यांच्यासह तिघाविरुद्ध विनयभंग अनुसूचित जाती आणि जमाती प्रतिबंधक अर्थात अ‍ॅट्रोसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यातल्या वाळुंज या गावात दोन गटात जमिनीच्या कारणावरून वाद झाला होता. त्यामध्ये आमदार सुरेश धस यांचा देखील समावेश होता. परंतु एका आदिवासी महिलेने विनयभंग करण्यात आल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली आहे. त्यानंतर पोलिसांनी आमदार सुरेश धस यांच्यासह त्यांची पत्नी प्राजक्ता धस आणि अन्य तीन आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपींवर अनुसूचित जाती आणि जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती बीड पोलिसांनी दिली आहे.आदिवासी महिलेला मारहाण झाल्याचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बीड जिल्ह्यातील वाळुंज (ता.आष्टी ) येथे दि. 15 ऑक्टोबर रोजी सायंकाळी एका महिलेला विवस्त्र करून फिरवल्याची धक्कादायक घटना घडली. 40 वर्षीय महिला पती आणि सुनेसह शेतात काम करत असताना त्याठिकाणी आलेल्या काही लोकांनी त्यांच्या शेतजमिनीवर ताबा घेण्याचा प्रयत्न केला. यासंदर्भात पीडितेने तक्रारीत म्हटले आहे की , रघु कैलास पवार आणि राहुल माणिक जगदाळे या दोघांनी पती आणि सुने समोरच मला विवस्त्र करून विनयभंग केला. प्राजक्ता सुरेश धस या त्याच ठिकाणी आडोश्याला उभे राहून ‘ घाबरू नका , तिला चांगला चोप द्या ‘ असे म्हणत होत्या. पती आणि सून माझ्या दिशेने येत असल्याचे पाहून दोघेही पळाले. त्यावेळी मी रघु पवार याला पकडण्यासाठी त्याच्या पाठीमागे पळत होते, असे आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

पोलिसांसमोर घडला प्रकार ?- पोलिसांसमोरच हा प्रकार घडल्याचा आरोप पीडितेने आपल्या तक्रारीत केला आहे. मात्र सदर घटनेची चित्रफीत समाज माध्यमातून प्रसारित झाल्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे.

COMMENTS