Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आदिवासी कुकी महिलांनी जपला बंधुभाव; लातूरकरांचे मणिपूरमध्ये रक्षाबंधन!

लातूर प्रतिनिधी -  गेले काही महिने अशांतता पसरलेल्या मणिपूरमध्ये जाऊन लातूरच्या विनायकराव पाटील कवठेकर यांनी रक्षाबंधन सण साजरा केला. यावेळी आदिव

ऐतिहासिक करार
अमरावती विमानतळावर ‘नाईट लँडिंग’ एप्रिलपासून
घनकचरा व्यवस्थापनासाठी 2 टिप्परची खरेदी

लातूर प्रतिनिधी –  गेले काही महिने अशांतता पसरलेल्या मणिपूरमध्ये जाऊन लातूरच्या विनायकराव पाटील कवठेकर यांनी रक्षाबंधन सण साजरा केला. यावेळी आदिवासी कुकी महिलांनी राखी बांधत बंधूभाव जपला. यावेळी शांतता, सोहार्द कायम राहावे, ही भावना सर्वांनीच व्यक्त केली.
कुकी आणि मैतई या दोन समाजामध्ये संघर्ष निर्माण होऊन अशांतता निर्माण झाली आहे. अशा स्थितीत आदिवासी कुकी समाज स्थलांतरित झाला आहे. अनेक ठिकाणी महिलांवर अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. अशा स्थितीत मनोबल वाढविण्यासाठी देशाच्या कोनाकोपर्‍यातील विविध संस्था, संघटना मणिपूरला भेट देत आहेत. त्याचाच भाग म्हणून शेतकरी नेते विनायकराव पाटील कवठेकर, अनंत अल्लासे यांनी मणिपूरच्या विविध भागांचा दौरा केला. तेथील अन्यायग्रस्त समाजबांधवांची भेट घेतली. तसेच रक्षाबंधनाचा सण साजरा करत आदिवासी कुकी महिलांकडून राखी बांधून घेतली.  उमरगा येथील श्रमजीवी परिवाराच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला असल्याचे विनायकराव पाटील यांनी सांगितले. अजूनही त्या भागात महिला- मुलींची उपासमार होऊ नये म्हणून, काम करण्याची, तसेच दानशुरांनी मदत करण्याची गरज असल्याचे पाटील यांनी बुधवारी सांगितले.

COMMENTS