Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अळसुंदे विद्यालयात वृक्षाबंधन व वृक्षदत्तक कार्यक्रम

कर्जत : कर्जत तालुक्यातील अळसुंदे येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर विद्यालयात असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांना विद्य

शिक्षिकेच्या नवऱ्याची मुख्याध्यापकाला मारहाण l LokNews24
BREAKING : अहमदनगर जिल्ह्यात अँटीजेन चाचणी वाढणार | Lok News24
जिल्हा बँकेत सुरू…श्रेयाचे भांडण

कर्जत : कर्जत तालुक्यातील अळसुंदे येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर विद्यालयात असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांना विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेल्या भव्य आकाराच्या राख्या बांधून रक्षाबंधन कार्यक्रम घेण्यात आला. या निमित्ताने विद्यालयात नव्यानेच लावलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या शंभर रोपांना ’एक विद्यार्थी एक झाड’ या योजनेनुसार दत्तक देऊन त्या झाडाच्या रक्षणाची शपथ विद्यार्थ्यांना देण्यात आली. विद्यार्थ्यांना ऋतू बदलानुसार येणारे सण उत्सव आणि त्यांचे पर्यावरणीय महत्त्व समजण्यासाठी विद्यालयात विविध कार्यक्रम घेतले जातात. त्याचाच एक भाग म्हणून हा कार्यक्रम घेण्यात आला. विद्यालयाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख सुनील गोरखे यांनी ’वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे’, हा पर्यावरण पूरक अभंग सादर केला. तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक रामदास परहर यांनी विद्यार्थ्यांना मानवी जीवनातील वृक्षांचे महत्त्व विषद केले व प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या वाढदिवसाला आपल्या परिसरात एक झाड लावून त्याचे संवर्धन करण्याचे आवाहन केले. विद्यालयाच्या समोर असलेल्या चार एकर क्षेत्रामध्ये लावलेल्या विविध झाडांचे संवर्धन करून ग्लोबल वॉर्मिंगसारख्या समस्येच्या निराकारणात वाटा उचलण्याचे आवाहन मोहन बनसुडे यांनी केले. या पर्यावरणपूरक कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रवींद्र विधाते, प्रवीण कांबळे व नितीन जगताप यांचे विशेष सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे अळसुंदे व देमनवाडी व पंचक्रोशीतील पर्यावरण प्रेमी नागरिक व अळसुंदे येथील विविध समाजसेवी संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी कौतुक केले.

COMMENTS