Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दशक्रियेच्या निमित्ताने वृक्षारोपण ; प्रा.नवलेंचा दिशादर्शक उपक्रम

अकोले : तालुक्यातील विडी कामगार चळवळीतील कार्यकर्ते कॉम्रेड स्व. काशिनाथ दगडू नवले यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. त्यांच्या दशक्रियेच्या निमित्ताने स्मृती जपण्यासाठी नातू प्रा. मंगेश नानासाहेब नवले यांनी आपल्या शेतातील परिसरात वृक्षारोपणाचा उपक्रम राबविला. प्रा. नवले हे अकोले एज्युकेशन सोसायटीच्या समशेपुर महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. या वृक्षारोपण प्रसंगी वृक्षप्रेमी रमाकांत दादा डेरे, संगमनेर महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य के. के. देशमुख, प्रगतशील शेतकरी भाऊसाहेब वावळे, विजय गुंजाळ, इंदुरी गावचे माजी सरपंच नानासाहेब नवले आदी उपस्थित होते. यावेळी प्रा. मंगेश नवले म्हणाले, की स्पर्धेच्या युगात यांत्रिकीकरण व औद्योगिकीकरणामुळे प्रगती झाली असली तरी वाढत्या नागरीकरणामुळे डोंगर सपाट होत असून झाडांची मोठ्या प्रमाणावर तोड होत आहे. यामुळे हवेतील तापमान वाढत असून प्रदूषणातून विविध आजारही वाढत आहेत. सरकारकडून रस्ते व महामार्गांच्या कामांमध्ये रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली शेकडो वर्षांपूर्वीची झाडे तोडली जातात; मात्र नियम असूनही त्या ठिकाणी नव्याने झाडे लावली जात नाहीत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. स्व. काशिनाथ नवले हे वैचारिक व अभ्यासू व्यक्तिमत्त्व होते. त्यांचे विचार कायम स्मरणात राहावेत, यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबविण्याचा मानस असल्याचे प्रा. नवले यांनी सांगितले. 

उत्तरेतील बहुतांश धरणे ‘दादां’ मुळेच
विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
अकोलेत दूध वाटून नववर्षाचे स्वागत

अकोले : तालुक्यातील विडी कामगार चळवळीतील कार्यकर्ते कॉम्रेड स्व. काशिनाथ दगडू नवले यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. त्यांच्या दशक्रियेच्या निमित्ताने स्मृती जपण्यासाठी नातू प्रा. मंगेश नानासाहेब नवले यांनी आपल्या शेतातील परिसरात वृक्षारोपणाचा उपक्रम राबविला.

प्रा. नवले हे अकोले एज्युकेशन सोसायटीच्या समशेपुर महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. या वृक्षारोपण प्रसंगी वृक्षप्रेमी रमाकांत दादा डेरे, संगमनेर महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य के. के. देशमुख, प्रगतशील शेतकरी भाऊसाहेब वावळे, विजय गुंजाळ, इंदुरी गावचे माजी सरपंच नानासाहेब नवले आदी उपस्थित होते.

यावेळी प्रा. मंगेश नवले म्हणाले, की स्पर्धेच्या युगात यांत्रिकीकरण व औद्योगिकीकरणामुळे प्रगती झाली असली तरी वाढत्या नागरीकरणामुळे डोंगर सपाट होत असून झाडांची मोठ्या प्रमाणावर तोड होत आहे. यामुळे हवेतील तापमान वाढत असून प्रदूषणातून विविध आजारही वाढत आहेत.

सरकारकडून रस्ते व महामार्गांच्या कामांमध्ये रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली शेकडो वर्षांपूर्वीची झाडे तोडली जातात; मात्र नियम असूनही त्या ठिकाणी नव्याने झाडे लावली जात नाहीत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

स्व. काशिनाथ नवले हे वैचारिक व अभ्यासू व्यक्तिमत्त्व होते. त्यांचे विचार कायम स्मरणात राहावेत, यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबविण्याचा मानस असल्याचे प्रा. नवले यांनी सांगितले. 

COMMENTS