Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नांदेड-नागपूर 361 राष्ट्रीय महामार्गावरील वृक्षतोड झाल्यामुळे सावली हरपली

संबंधीत विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांचे दुर्लक्ष

हदगाव प्रतिनिधी - नांदेड-नागपूर 361 हा राष्ट्रीय महामार्ग झाला असून गेल्या पाच वर्षापासून महामार्गाच्या दुतर्फा असलेल्या मोठमोठ्या वृक्षांची तोड

पुण्यात दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार
औशात सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी जय्यत तयारी
सोलापूर रेल्वे विभागात राजभाषा हिंदी कार्यान्वयन समितीची बैठक उत्साहात

हदगाव प्रतिनिधी – नांदेड-नागपूर 361 हा राष्ट्रीय महामार्ग झाला असून गेल्या पाच वर्षापासून महामार्गाच्या दुतर्फा असलेल्या मोठमोठ्या वृक्षांची तोड करण्यात आली. रस्त्याच्या दोन्ही बाजूला अद्यापही वृक्षाची सावली झाली नसल्याने अनेक वेळा वृक्ष लागवड करूनही संगोपना अभावी रोपटे वाळून गेल्याने प्रवासी नागरिकांना उन्हाळ्याच्या दिवसात घटकावर विसाव्यासाठी सावली हरपल्याने सावलीचा शोध घ्यावा लागत आहे.  संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी 15 ते 30 वर्ष आयुष्य असलेल्या झाडाची कत्तल केली. याकडे मात्र साफ जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
पूर्वी नांदेड-नागपूर या राज्य महामार्गावर हजारो संख्येने मोठमोठे वृक्ष होते .राज्य महामार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाल्याने कामकाजाच्या सुरुवातीच्या अगोदरच या वृक्षाची संबंधित विभागाने त्याचा लिलाव करून गुत्तेदारांनी वृक्षतोड मोठ्या प्रमाणात केली गेल्या अनेक वर्षापासून राज्य महामार्गाच्या दोन्ही बाजूला मोठमोठे वृक्ष होते ते नामशेष करण्यात आले आहेत. दळणवळणाच्या विकासासाठी राष्ट्रीय महामार्गाचे काम होऊन रस्त्याचे रुंदीकरण झाले तर गेल्या पाच वर्षापासून चालू असलेली कामे काही ठिकाणी रेंगाळत पडली आहेत. तर मौजे मानवाडी फाटा येथून मौजे निवघा (बाजार) जाण्यासाठी वळण रस्ता आहे येथे उडान पूल नसल्यामुळे कित्येकांना आजतागायत अपघातामध्ये आपला आतापर्यंत जीव गमावावा लागला आहे.त्यामुळे मौजे निवघा(बाजार),मौजे रुई,मौजे धानोरा, मौजे उचेंगाव(खु),मौजे येळम,मौजे मनवाडी मौजे अंबाळा येथील नागरिकाकडून उडान पुलाची मागणी जोर धरत आहे. तरी हदगाव तालुक्यातील खासदार ,आमदार माधवराव पाटील जळगावकर व अन्य लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देतील का ? असा प्रश्न वृक्षप्रेमी व सामान्य नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. तर हदगाव शहरात अंतर्गत असलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे काम अजूनही तसेच रखडलेली आहे. प्रवाशांना धुळीचा सामना करत प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत संबंधित कंत्राटदाराला वेळोवेळी सूचना,लेखी,अभिप्राय,उपोषण करूनही काही परिणाम झाला नाही. हे मात्र तितकच सत्य आहे. एकीकडे दळण-वळणाचा विकास झाला असला तरी दुसरीकडे  वृक्षाअभावी पर्यावरणाचा र्‍हास झाल्याचे चित्र दिसून येत आहे. विकास कामाचा गाजावाजा होत असताना वृक्ष लागवडीचा त्यावेळी गाजावाजा केला गेला. पण अवघ्या पाच वर्षांमध्येच राष्ट्रीय महामार्गाचे काम अपूर्ण असून काम पूर्ण होताच दोन्ही बाजूला तातडीने वृक्ष लागवड करून त्याचे योग्य पद्धतीने संगोपन करण्याची जबाबदारी संबंधित विभागाने राष्ट्रीय महामार्गाचे काम करणार्‍या कत्रांटदारावर सोपविण्याची असल्याचे त्यावेळी बोलल्या जात होते. आज पाच वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतरही राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूला प्रवाशांना वाढत्या तापमानात घटकाभर वाहन बाजूला लावून कुठे विश्रांती घ्यावी म्हटले तर विश्रांती घेण्यासाठी एकही वृक्ष दिसत नाही. अनेक वेळा या राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूला वृक्ष लागवड करूनही संबंधित विभागाच्या नाकतर्फेपणामुळे त्यांचे योग्य संगोपन होत नाही. रोपटे लहानपणीच अक्षरशः वाळून जात आहेत त्यामुळे नागपूर नांदेड 361 राष्ट्रीय महामार्गावरिल सावली हरपली म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. रस्त्याच्या बाजूला असलेली छोटी वृक्ष पुन्हा लावली असली तर अगदी उत्तम झाली असते ती सुविधा सबंधित गुत्तेदाराकडे नव्हती हे आमचे दुर्दैव म्हणावे लागेल.दरम्यान, राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूस केव्हा वृक्ष आणि ती झाडे मोठी किंवा होतील. यास कोण जबाबदार ? कामात कुचराई करणार्‍या गुत्तेदार व संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी कर्मचार्‍यांची योग्य ती चौकशी करून कार्यवाही होणे गरजेचे आहे. विकासाच्या नावाखाली मूल्यवान झाडे ही विकली असाही आरोप होत आहे. राष्ट्रीय महामार्गाला राज्य महामार्गासारखे दोन्ही बाजूस वृक्ष केव्हा होतील व गत वैभव केव्हा प्राप्त होईल याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS