Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आषाढी यात्रेसाठी परिवहन महामंडळ ५ हजार २०० विशेष बसेस सोडणार : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई, दि. ११ : आषाढी यात्रेनिमित्त विठू नामाचा जयघोष करीत श्री श्रेत्र पंढरपूर ला जाणाऱ्या भाविक प्रवाशांसाठी राज्य परिवहन महामंडळाने यात्राकाळा

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केली त्र्यंबकेश्वर परिसराची पाहणी
महाराष्ट्राच्या जीएसटीतून परतावा करत केंद्र सरकारने  शेतकऱ्यांना मदत करावी : बाळासाहेब थोरात.
कामातच राम आहे; मतदारसंघात सेवा करण्याकडे कोल्हे परिवाराचे लक्ष : विवेक कोल्हे

मुंबई, दि. ११ : आषाढी यात्रेनिमित्त विठू नामाचा जयघोष करीत श्री श्रेत्र पंढरपूर ला जाणाऱ्या भाविक प्रवाशांसाठी राज्य परिवहन महामंडळाने यात्राकाळात ५ हजार २०० विशेष बस सोडण्याचे नियोजन केले आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. ते आषाढी एकादशीच्या नियोजनासाठी पंढरपूर  येथे बोलावलेल्या एसटीच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते. यावेळी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर उपस्थित होते.

मंत्री श्री. सरनाईक म्हणाले, विशेष म्हणजे यंदा राज्यातील कोणत्याही गावातून ४० अथवा त्या पेक्षा जास्त भाविक प्रवाशांनी एकत्रित मागणी केल्यास त्यांना थेट पंढरपूर ला जाण्यासाठी त्यांच्या गावातून एसटी बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी भाविक प्रवाशांनी आपल्या जवळच्या आगारात संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

बस स्थानकाचे नाव आणि जिल्हानिहाय सोडण्यात येणाऱ्या बसेस

चंद्रभागा बसस्थानक : मुंबई, ठाणे, रायगड, सातारा, पुणे विभाग व पंढरपूर  आगार.

भिमा यात्रा बसस्थानक देगाव : छत्रपती संभाजी नगर , नागपूर व अमरावती प्रदेश.

विठ्ठल कारखाना : नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर.

पांडुरंग बसस्थानक: सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग

एसटी कर्मचाऱ्यांना मोफत जेवण व चहा नाश्ता

यात्रा काळात पंढरपूर  येथे येणाऱ्या सर्व एसटी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या चहा – नाश्ता व जेवणाची मोफत सोय करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष  प्रताप सरनाईक यांनी दिली.

भाविक-प्रवाशांनी, एसटीच्या सुरक्षित प्रवासी सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले आहे.

COMMENTS