Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

केज येथे जनशिक्षण संस्था बीड यांच्या वतीने असिस्टंट ड्रेस मेकरचे प्रशिक्षण संपन्न

केज प्रतिनिधी - दिनांक 3 ऑगस्ट 2023 रोजी केज शहरातकौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय,भारत सरकार अंतर्गत जन शिक्षण संस्था बीड या संस्थेच्या वतीने

कोपरगावच्या जनतेला न्याय मिळाला – नगराध्यक्ष वहाडणे
पुणे विमानतळाला संत तुकाराम महाराजांचे नाव देणार
मोदींच्या स्वागतासाठी निसर्गही गेला सडा शिंपडून  

केज प्रतिनिधी – दिनांक 3 ऑगस्ट 2023 रोजी केज शहरातकौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय,भारत सरकार अंतर्गत जन शिक्षण संस्था बीड या संस्थेच्या वतीने असिस्टंट ड्रेस मेकरचा कोर्स पूर्ण झाला आहे.या संस्थेच्या वतीने 13 एप्रिल ते 3 ऑगस्ट पर्यंत घेण्यात आलेल्या प्रशिक्षणामध्ये 20 महिलांनी सहभाग घेतला होता. या प्रशिक्षणामध्ये महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहणे व घर बसल्या त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा हा उद्देश या संस्थेचा आहे. या प्रशिक्षणासाठी या संस्थेने होतकरू फॅशन डिझायनिंग कोर्स केलेल्या महिला शिक्षिका ह्या महिला प्रशिक्षणार्थी यांना शिकवण्यासाठी या अनुभवी महिला ट्रेनर शिक्षीका म्हणून त्यांचा सहभाग होता.या अनुभवी ट्रेनर महिला शिक्षकांनी सदरील प्रशिक्षणार्थी महिला यांना संपूर्ण कालावधीमध्ये प्रशिक्षण अति उत्कृष्टपणे दिले आहे.या प्रशिक्षणामध्ये महिलांना बेबी फ्रॉक, ब्लाऊजसह वेगवेगळ्या डिझायनिंग फॅन्सी ड्रेस, स्कर्ट विविध डिजाईनचे पॅटर्नचे प्रशिक्षण शिकवले आहे.तसेच टाकाऊ कपड्या पासून आकर्षक व टिकाऊ डिजाईनचे ड्रेस कसे बनवायचे ? याचेही प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षणामुळे बर्‍याच महिलांना रोजगार सुद्धा उपलब्ध झाला आहे. केज शहरात जनशिक्षण संस्था बीडचे संचालक गंगाधर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण पूर्ण झालेल्या महिलांची परीक्षा घेण्यात आली या परीक्षेमध्ये महिलांनी टाकाऊ कपड्या पासून टिकाऊ व आकर्षक कपडे कसे शिवायचे ? हे देखील सांगितले व टाकाऊ कपड्या पासून ड्रेस कसे शिवायचे ? याचे डेमो देखील करून दाखवले.यावेळी परीक्षक म्हणून जनशिक्षण संस्थेचे सहाय्यक अधिकारी धर्मराज जाडकर,विषय तज्ञ सौ.रोहिणी शेटे यांनी काम पाहिले तसेच या प्रशिक्षणासाठी प्रशिक्षिका म्हणून दिपाली कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.त्यांनी प्रशिक्षणार्थी महिलांना उत्कृष्ट असे मार्गदर्शन केले.या मार्गदर्शनामध्ये विषयतज्ञ सौ.रोहिणी शेटे मॅडम यांनी जास्तीत जास्त महिलांनी यामध्ये सहभाग घ्यावा व प्रशिक्षण पूर्ण करावे असेही आवाहन केले.

COMMENTS