मनमाड प्रतिनिधी/ धावत्या रेल्वेसह प्लॉटफार्मवर प्रवाशांचे लक्ष नसल्याची संधी साधत त्यांचे किंमती सामान लंपास करणार्या टोळीतील अविनाश वाल्मिक घु

मनमाड प्रतिनिधी/ धावत्या रेल्वेसह प्लॉटफार्मवर प्रवाशांचे लक्ष नसल्याची संधी साधत त्यांचे किंमती सामान लंपास करणार्या टोळीतील अविनाश वाल्मिक घुले या संशयितास जेरबंद करण्यात मनमाड रेल्वे पोलिसांना यश आले आहे. या संशयिताकडून 7 मोबाईलसह सुमारे साडेचार लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्याच्याकडून 9 गुन्ह्यांची उकल झाली आहे. त्याच्या इतर साथीदारांचा शोध सुरु पोलीस घेत असल्याची माहिती पो.नि. शरद जोगदंड यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली. मनमाड, भुसावळ, मनमाड, इगतपुरी आणि मनमाड-कोपरगाव मार्गावर धावत्या रेल्वेत प्रवाशांचे दुर्लक्ष असल्याची संधी साधत महागड्या मोबाईलसह दागिने, पर्ल्स, मौल्यवान वस्तू आणि इतर सामान चोरीच्या घटना गत काही महिन्यांपासून घडत होत्या. त्यामुळे रेल्वे पोलीस या गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी सक्रिय झाले होते. रेल्वेतून एैवज लंपास करणारी चोरट्यांची टोळी कार्यरत असल्याची माहिती मिळताच रेल्वे पोलीस अधिक्षक गणेश शिंदे, उपअधिक्षक दिपक काजवे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. शरद जोंगदंड यांनी स.पो.नि. सोमनाथ वाघमोडे, उपनिरीक्षक सुरेश सोनवणे यांच्यासह पथकास टोळीचाशोध घेण्याचे निर्देश दिले होते. या पथकाने मिळालेल्या माहितीवरून सापळा रचत अविनाश वाल्मीक घुले (रा. शिंगणापूर, ता. कोपरगाव) यास ताब्यात घेत कसून चौकशी करत जबरी चोरीच्या गुन्ह्यासह चोरीचे 9 गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणत त्याच्याकडून प्रवाशांचे चोरलेले मोबाईल, मौल्यवान वस्तू आणि इतर साहित्य असा एकूण 4 लाख 28 हजार 997 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या अविनाश घुलेने पुणे काझीपेठ एक्ससह इतर 9 गाड्यात चोरी केल्याचे समोर आले असून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पो.नि. जोगदंडे यांनी व्यक्त केली. पथकात दिनेश पवार, हेमराज आंबेकर, संजय निकम, महेंद्रसिंग पाटील, संतोश भालेराव, प्रकाश पावसे, किरण व्हंडे, अमोल खोडके, किशोर कांडीले, राज बच्छाव आदी पोलिसांचा समावेश होता.
COMMENTS