Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंंबई-बंगळुरू महामार्गावर वाहतूक कोंडी

खेड-शिवापूर परिसरात अल्कोहोल टँकर पलटी

पुणे ः मुंबई- बंगळुरू महामार्गावर पुणे शहराजवळ खेड शिवापूर परिसरात अल्कोहोल वाहतूक करणारा एक टँकर पलटी झाल्याची घटना घडली.घटनास्थळी तात्काळ दा

धीरेंद्र शास्त्रीचं वादग्रस्त वक्तव्य
फलटणला होणारे राष्ट्रीय सामने यशस्वी पार पडतील : श्रीमंत रामराजे
माथेरानमधील पर्यटन उद्यापासून सुरू

पुणे ः मुंबई- बंगळुरू महामार्गावर पुणे शहराजवळ खेड शिवापूर परिसरात अल्कोहोल वाहतूक करणारा एक टँकर पलटी झाल्याची घटना घडली.घटनास्थळी तात्काळ दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांच्या सुचक्तेने गंभीर दुर्घटना टळली.
अग्निशामक दलाने दिलेल्या माहितीनुसार, खेड शिवापुर टोल नाक्या परिसरात तृप्ती हॉटेलसमोर राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचा अल्कोहोल वाहतूक करणारा टँकर सांगलीकडून वसईला जात होता.संबधित टँकर उलटल्याची माहिती अग्नीशमन दलाच्या नांदेड सिटी अग्निशमन दलाला मिळाली.त्यानुसार जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. पलटी झालेल्या टँकरमधील चालक आणि आणखी एकाला बाहेर काढण्यात आले. उपचारासाठी त्यांना रुग्णलयात दाखल करण्यात आले. तसेच क्रेनचा वापर करून टँकर रस्त्यातून बाजूला केला गेला आणि रस्ता वाहतुकीस मोकळा करून देण्यात आले. अग्निशमन दलाचे जवान सुजित पाटील. राठोड, शुभम माळी, पंकज माळी, साळुंखे, मायनाले यांनी ही कामगिरी केली. मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळाचे केशव व्यंकटेश चांफेकर क्रीडागृहात आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी पंधरा मिनिटात आग आटोक्यात आणली. केशव व्यंकटेश चांफेकर क्रीडागृहात खेळाचे साहित्य ठेवलेल्या ठिकाणी आग लागल्याने धूर मोठ्या प्रमाणात झाला. जवानानी तातडीने आगीवर पाण्याचा मारा सुरू करत आग आग आटोक्यात आणली. खेळाडू आणि शिक्षक यांच्याशी चर्चा करून सर्वजण सुरक्षित असल्याची खातरजमा करण्यात आली.

COMMENTS