Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कन्नड चाळीसगाव औट्राम घाटामध्ये ट्राफिक जाम ; वाहन चालक त्रस्त 

औरंगाबाद प्रतिनिधी - मराठवाडा व खान्देशला जोडणारा कन्नड चाळीसगाव औट्राम घाट या घाटामध्ये दिवसातून तीन ते चार पाच वेळा वाहतूक जाम होत असते त्या

तक्रारदार गायब, पण खटला सुरू !;परमबीर सिंहांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बोचरी टीका
भाग्यश्री पेपर व जायंटस प्राइड तर्फे भव्य सामूहिक विवाह
20 वर्षात माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना दिल्ली कळाली नाही | LOK News 24

औरंगाबाद प्रतिनिधी – मराठवाडा व खान्देशला जोडणारा कन्नड चाळीसगाव औट्राम घाट या घाटामध्ये दिवसातून तीन ते चार पाच वेळा वाहतूक जाम होत असते त्यामुळे वाहन चालकांना दोन-तीन तास जाममध्ये अडकून पडावे लागते यामध्ये शासकीय कर्मचारी असो किंवा प्रवासी असो यांना त्याचा त्रास सहन करावा लागत असल्याचे प्रतिक्रिया यावेळी वाहन चालक व प्रवाशांनी दिली आहे. घाटात नाश्तापाणी कसली सोय नाही प्रवास करताना प्रवाश्यासोबत लहान लहान मुले असतात वयोवृद्ध असतात त्यामुळे काही अनुचित प्रकारही घडू शकतो प्रशासनाने जर हा मार्ग वनवे केला तर यातून मार्ग निघू शकतो व वाहतूकही सुरळीत होऊ शकते अशी प्रतिक्रिया काही वाहन चालकांनी दिली. या रस्त्यावर येणारी वाहने व नागद मार्गे जाणारी वाहने ठेवली तरी या ठिकाणी बंदोबस्तासाठी असलेले पोलीस प्रशासनाचे कर्मचारी व इतर वाहन चालक नागरिक यांचा सर्वांचा त्रास कमी होईल व वाहतुकी सुरळीत चालू शकते अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिक देत आहे. एकीकडे समृद्धी महामार्ग बनवला त्यापेक्षा या रस्त्याचे काम लवकर केले तर सामान्य नागरिकांची यातून कोंडी सुटेल असे मत वाहन चालकांनी व्यक्त केले आहे.

COMMENTS