Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सलग सुट्ट्यांमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडी

मुंबई/प्रतिनिधी ः गणेशोत्सवाच्या विसर्जनापासून सलग सुट्ट्यामुळे अनेकांची गावाकडे जाण्यासाठी चाकरमान्यांची लगबग सुरू झाली आहे. त्यामुळेच मुंबई-पुण

चालकाचे बस वरील बस नियंत्रण सुटल्याने बस रिक्षाला धडकली
नोटबंदीबाबत आम्ही मूक दर्शक बनू शकत नाही सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले
कर्जत व पुणे पोलिसांची धडाकेबाज कारवाई : ६० लाखांची रोकड केली हस्तगत

मुंबई/प्रतिनिधी ः गणेशोत्सवाच्या विसर्जनापासून सलग सुट्ट्यामुळे अनेकांची गावाकडे जाण्यासाठी चाकरमान्यांची लगबग सुरू झाली आहे. त्यामुळेच मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांची वर्दळ वाढली असून मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गणपती उत्सवाचा सण आटोपून गावी आलेल्या चाकरमान्यांनी परतीचा प्रवास सुरू केला आहे. तसेच सलग सुट्ट्यांमुळे शहरातील चाकरमानी गावाकडे येत आहेत. त्यामुळे महामार्गांवर वाहनांची वर्दळ वाढली असून मोठी वाहतुक कोंडी पाहायला मिळत आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर बोरगाव घाटात ट्राफिक जाम झाले आहे. तसेच लोणावळ घाटातही वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत, दरम्यान, गेल्या चार दिवसांपासून सलग सुट्ट्या सुरू आहेत. गणेशोत्सवानंतर एक दिवस सुट्टी राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर शनिवार, रविवार आणि सोमवार (2 ऑक्टोंबर) महात्मा गांधींजींची जयंती असल्यामुळे सुट्टी असणार आहे. त्यामुळेच मुंबईकर मोठ्या प्रमाणावर बाहेर पडले असून त्यामुळेच महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.

COMMENTS