नंदुरबार : गणेशोत्सव काळात डीजेमुक्त मिरवणुकांना नंदुरबार जिल्ह्यातील मंडळांनी प्रतिसाद दिल्यानंतरही पारंपारिक बँड पथकला पोलिस प्रशासन परवानगी दे

नंदुरबार : गणेशोत्सव काळात डीजेमुक्त मिरवणुकांना नंदुरबार जिल्ह्यातील मंडळांनी प्रतिसाद दिल्यानंतरही पारंपारिक बँड पथकला पोलिस प्रशासन परवानगी देत नसल्याने गणेश मंडळाचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. तालुक्यातील गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आणि सदस्यांनी जिल्हा प्रशासनास वाद्यांना परवानगी देण्याची मागणी केली. नंदुरबार जिल्हा पोलिस दलाच्या वतीने डीजेमुक्त गणेश उत्सवाची घोषणा केली आहे. या घोषणेला ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील गणेश मंडळांनी प्रतिसाद दिला खरा मात्र पारंपारिक बँड आणि पारंपारिक वाद्यांना परवानगी देताना पोलिस प्रशासनाकडून मंडळाच्या कार्यकर्त्यांना अडचणी निर्माण केल्या जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
COMMENTS