Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उल्हासनगरमध्ये नवजात बाळांच्या खरेदी-विक्रीचा पर्दाफाश

डमी ग्राहक बनून पोलिसांकडून भंडाफोड, डॉक्टरांसह पाच जणांना अटक

उल्हासनगर/प्रतिनिधी : उल्हासनगरमध्ये एक महिला डॉक्टरच नवजात बाळांची लाखो रुपयांना खरेदी विक्री करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डॉक्टर

IAS ऑफिसरला अटक | LokNews24
किरीट सोमैया यांची माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार टीका 
खासगी बस, ट्रॅक्टरचा भीषण अपघात; दोन ठार, सहा जखमी| LOKNews24

उल्हासनगर/प्रतिनिधी : उल्हासनगरमध्ये एक महिला डॉक्टरच नवजात बाळांची लाखो रुपयांना खरेदी विक्री करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डॉक्टरने लहान मुलांच्या खरेदी विक्रीचा जणू बाजारच मांडला होता. कॅम्प नंबर तीनच्या कंवरराम चौक परिसरात असलेल्या महालक्ष्मी नर्सिंग होम मधील डॉक्टर चित्रा चैनानी या आपल्या टोळीच्या माध्यमातून नवजात बाळाची खरेदी विक्री करत होत्या. या प्रकरणी आरोपी डॉ चित्रा चेनानी सह महिला दलाल असे एकूण पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. उल्हासनगरच्या काही महिला समाजसेविकांना याची माहिती मिळताच त्यांनी बनावट ग्राहकांच्या माध्यमातून या सगळ्या प्रकारचा पर्दाफाश केला आहे. दरम्यान नाशिकहून आलेल्या एका महिलेच्या 22 दिवसाच्या बाळाला सात लाखांना डमी ग्राहकाला विकताना ठाणे क्राईम ब्रांच आणि महिला बालकल्याण विभागाच्या अधिकार्‍यांनी रंगेहाथ पकडले. धक्कादायक म्हणजे मुली आणि मुलांचे वेगवेगळे दर या महिला डॉक्टरने ठरविले होते. 22 दिवसांच्या बाळाची विक्री सात लाखात होणार होती. दरम्यान महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेरील राज्यातील टोळी या बाळाची विक्री करणार्‍या या रॅकेटमध्ये सहभागी आहे. सध्या महिला बालकल्याण विभाग आणि क्राईम ब्रान्च अधिकारी या सगळ्या घटनेची तक्रार मध्यवर्ती पोलिसात केल्यानंतर पोलिसांनी आरोपी डॉ. चित्र चेनानीसह पाच जणांवर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करून या पाच ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. अटक आरोपींना आज कोर्टात हजर करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सर्व आरोपींविरुद्ध कलम 370 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाच्या परवानगीने सर्व आरोपींना रात्री अटक करण्यात आली आहे. आज कोर्टात सर्व आरोपींना हजर करणार आहे. रॅकेट कशाप्रकारे चालते? याचा सूत्रधार कोण आहे? अजून कुठे कुठे अशा प्रकाराचे रॅकेट चालवले जाते का? याचा तपास सुरू आहे. चार महिला आणि एका पुरूष आरोपीला अटक करण्यात आला आहे. दोन महिला नाशिकच्या तर पुरूष आरोपी बेळगावचा आहे. पोलीस पुढील तपास करत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी माहिती दिली आहे. या प्रकरानंतर नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया येत असून आरोपींवर कडक कारवाईची मागणी करण्यात येत आहे.

COMMENTS