Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माळशेज घाटातील पर्यटन जीवावर बेतले

मुंबईतील तरूण-तरूणीचा मृत्यू

पुणे ः मान्सून दाखल झाल्यानंतर पडणारा पाऊस, त्यातच सकाळचे दाट धुक्ये, यात प्रवास करण्याचा अनेकांचा आवडीचा छंद असतो. मात्र असाच प्रवास मुंबईतील तर

ओमायक्रॉनने अकोलेकरांचे वाढवले टेन्शन…
मनसेची विधानसभेसाठी स्वबळावर लढण्याची तयारी ?
‘बाय बाय यश समीर’

पुणे ः मान्सून दाखल झाल्यानंतर पडणारा पाऊस, त्यातच सकाळचे दाट धुक्ये, यात प्रवास करण्याचा अनेकांचा आवडीचा छंद असतो. मात्र असाच प्रवास मुंबईतील तरूण-तरूणीच्या जीवावर बेतल्याचे दिसून आले आहे. माळशेज घाटात वर्षाविहारासाठी आलेल्या मुंबईतल्या तरुण-तरुणीचा अपघातात मृत्यु झाल्याची दुदैवी घटना समोर आली आहे. माळशेजच्या निसर्गाचा आनंद घेण्यासाठी मुंबईमधील सांताक्रुज परिसरात राहणारे रोहित डिंगळकर आणि नंदिनी मयांगडे हे दोघे तरुण आणि तरुणी वर्षा सहलीसाठी आले होते. सहल करुन परत जाताना त्यांच्या दुचाकीचा आणि एसटी बसचा भीषण अपघात झाला. ज्यामध्ये दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, पांढरे शुभ्र धुकं आणि नागमोडी वळणाचा अंदाज न आल्याने हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पांढरे धुके अन् वळणाच्या रस्त्याचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडली. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, माळशेज घाटातल्या निसर्गाचे सौंदर्य पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. यामुळे मोठया संख्येने पर्यटक माळशेज घाटात पावसाळी सहलीचे आयोजन करत असतात. मात्र माळशेज घाटाची सफर मुंबईतील तरुण- तरुणीला चांगलीच महागात पडली असून भीषण अपघातात दोघांचाही मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

COMMENTS