Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आमच्यात फाटले, उगीच शंका ठेवू नका

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले स्पष्टीकरण

पुणे ः राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये उभी फूट पडली असली तरी राष्ट्रवादी काँगे्रसमधील शरद पवार गट आणि अजित पवार गट एकत्र येतील अशी कार्यकर्त्यांना अपेक

नवी मुंबई विमानतळचा पहिला टप्पा मार्च २०२५ पर्यंत पूर्ण होणार
सुप्रियाविरूद्ध सुनेत्राला उभे करणे चूकच
राष्ट्रीय पुरस्कारांमुळे राज्याच्या गौरवशाली परंपरेचा मराठमोळा ठसा अधिक ठळक झाला – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे गौरवोद्गार

पुणे ः राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये उभी फूट पडली असली तरी राष्ट्रवादी काँगे्रसमधील शरद पवार गट आणि अजित पवार गट एकत्र येतील अशी कार्यकर्त्यांना अपेक्षा आहेत. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकत्र येण्यावर भाष्य करतांना म्हटले की, अरे बाबांनो आता आमच्यात फाटले आहे, उगीच मनात शंका ठेवू नका, असे शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा एकत्र येण्याच्या प्रश्‍नाला पूर्णविराम दिला आहे. आपला वेगळा फाटा आहे, त्यांचा वेगळा फाटा आहे, असे म्हणत त्यांनी विरोधकांवर टीका केली.
खासदार अमोल कोल्हे यांच्या उमेदवारीवरून देखील त्यांनी जोरदार टोला लगावला. अमोल कोल्हे यांना निवडून देण्याचे आवाहन मीच तुम्हाला केले होते. त्यानुसार तुम्ही त्यांना निवडूनही दिले. मात्र काही दिवसातच अमोल कोल्हे हे माझ्याकडे आले आणि मला मतदारांना वेळ देता येत नसून मला माझ्या क्षेत्रात नुकसान होत असल्याचं सांगितलं. आम्हाला उमेदवार मिळाला नाही की, आम्ही कलाकार पुढ आणतो. तसेच अमोल कोल्हे यांना उमेदवारी दिली होती, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांची खिल्ली देखील उडवली. मुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात अजित पवार यांनी मतदारसंघातील विविध विकास कामांचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनात नागरिकांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्‍वासन दिले. 1991 मध्ये याच मतदारांनी मला खासदार केले. मात्र, मी तेव्हा नवखा होतो. पुढील काळात राजकारणाचे समीकरण बदलले आणि मला पुन्हा राज्याच्या राजकारणात यावे लागले. राज्याच्या राजकारणात देखील शेतकर्‍यांच्या अडचणी आणि समस्या व्यवस्थित लक्षात घेऊन त्यातून मार्ग काढण्याचा माझा कायम प्रयत्न असतो. मात्र, आमच्यात आता सरळ सरळ दोन फाटा पडल्या आहेत. काहीजण म्हणतात ती कधीतरी एकत्र येतील, त्यामुळेच आमचे निम्मे गार होतात. त्यात दबक्या आवाजात मलाही विचारतात दादा पुढे काही होईल का? त्यामुळे आजही लोकांच्या मनात तशा प्रकारच्या शंका आहे. मात्र मी तुम्हाला स्पष्ट सांगतो आमच्यात दोन फाटा पडल्या आहेत. उगाच मनात काहीही शंका ठेवू नका, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. घोडगंगा साखर कारखाना चांगला चालवा, नसता त्यावर प्रशासक नेमू. शेतकर्‍यांची पिळवणूक होऊ नये अशी आमची भूमिका आहे. हा कारखाना संकटातून बाहेर येऊ शकतो. आमदाराने त्यांचा खासगी कारखाना व्यवस्थित चालवला पण नागरिकांच्या हक्काचा कारखान्याची माती केली, असे म्हणत अजित पवार यांनी घोडगंगा साखर कारखान्यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली. छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्यक्रमातून अमोल कोल्हे मध्येच उठून गेले. त्यावेळी त्यांनी नीलेश लंके यांच्या मतदारसंघात माझं नाटक असल्याचे कारण मला सांगितले. त्यांच्या पाठोपाठ अशोकही उठले, मी म्हणालो कार्यक्रम होईपर्यंत थांबा. छत्रपती संभाजी राजांमुळेच तुमची ओळख निर्माण झाली आहे. मात्र त्यांच्याच कार्यक्रमातून तुम्ही निघुन गेले. ही लोकशाही आहे, ज्याला बसायचे तो बसतो ज्याला जायचं तो जातो, अशा शब्दात अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांना फटकारले आहे.

COMMENTS