Homeताज्या बातम्यादेश

प्रयागराजमध्ये उद्या हमारा संविधान हमारा स्वाभिमानचे आयोजन

नवी दिल्ली : भारतीय राज्यघटना आणि नागरिकांच्या कायदेशीर अधिकारांविषयी जागरूकता वाढविण्याच्या दिशेचे एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, न्याय विभागाने ह

आरसीएफच्या कामासाठी 89 झाडांवर गंडांतर
संकटातून पथदर्शी मार्ग काढण्याचा विश्‍वास : अमिताभ कांत
नातवानेच केली आजीची हत्या

नवी दिल्ली : भारतीय राज्यघटना आणि नागरिकांच्या कायदेशीर अधिकारांविषयी जागरूकता वाढविण्याच्या दिशेचे एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, न्याय विभागाने हमारा संविधान हमारा सन्मान ही मोहीम सुरू केली होती. देशभरात गेले वर्षभर ही मोहीम यशस्वीरित्या राबवली गेली. या यशानिमीत्त न्याय विभागाने उत्तर प्रदेशात प्रयागराज इथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यादरम्यान 24 जानेवारी 2025 रोजी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
24 जानेवारी रोजी नवी दिल्लीतील डॉ. बी. आर. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात उपराष्ट्रपतींच्या हस्ते ’हमारा संविधान हमारा सन्मान’ मोहिमेचा प्रारंरंभ करण्यात आला होता. 2047 पर्यंत विकसित भारत घडवण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी देशातल्या प्रत्येक नागरिकाने सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहनही या मोहिमेच्या माध्यमातून केले जात आहे. भारताच्या प्रजासत्ताकाचे 75 वे वर्ष आणि राज्यघटना स्वीकारल्याच्या 75 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून ही मोहीम सुरू केली गेली होती. आत्तापर्यंत या मोहिमेत लक्षणीय लोकसभाग सहभाग दिसून आला असून, या मोहीमेअंतर्गत चूर्ॠेीं या व्यासपीठावर 1.3 लाखांपेक्षा जास्त नागरिकांनी उत्साहाने पंच प्रण विषयक शपथ घेत, राष्ट्र उभारणीप्रती आपली बांधिलकी दर्शविली आहे. ग्राम विधी चेतना उपक्रमांतर्गत देशभरातील विधी शिक्षण संस्थांच्या विद्यार्थ्यांनी दत्तक घेतलेल्या गावांमध्ये कायदेविषयक जनजागृती उपक्रमही राबवले, या माध्यमातून त्यांनी 21000+ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत, प्रत्यक्ष जमीनीवर लोकसभाग मिळत राहील याचीही सुनिश्‍चिती केली. याव्यतिरिक्त न्याय विभागाने नारी भागीदारी आणि वंचित वर्ग सन्मान या उपक्रमांअंतर्गत दूरदर्शन आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठासोबत (खॠछजण) सहकार्यपूर्ण भागिदारी प्रभावी वेबिनारचे आयोजित केले होते. या माध्यमातून 70 लाखांपेक्षा जास्त प्रेक्षकांचा सहभाग लाभला. यामुळे कायदेविषयक आणि सामाजिक बाबींमध्ये महिलांचा सहभाग वाढायलाही मदत झाली. युवकांना प्रेरणा मिळावी, यासाठी नवभारत नवसंकल्प अभियानांतर्गत संवादी स्वरुपाच्या विविध स्पर्धांचे आयोजनही करण्यात आले होते. या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागाला प्रोत्साहन दिले गेले तसेच त्यांच्यामध्ये उज्वल भविष्यासाठी जबाबदारीची भावना जागृत करण्याचा प्रयत्न केला गेला. गेले वर्षभर सुरू असलेली ही मोहिम देशाच्या अनेक भागांपर्यंत पोहचली आहे. या वर्षभरात या मोहीेअंतर्गत बिकानेर (राजस्थान), प्रयागराज (उत्तर प्रदेश) आणि गुवाहाटी (आसाम) इथे प्रादेशिक कार्यक्रमांचेही आयोजन केले गेले. या उपक्रमांना सुमारे पाच हजारांपेक्षा जास्तत नागरिकांनी प्रत्यक्ष हजेरी लावली, तर या अभियानाशी जोडलेल्या सबको न्याय हर घर न्याय, नव भारत नव संकल्प आणि विधी जागृती अभियान यांसारख्या इतर उपक्रमांमध्ये आठ लाखांपेक्षा जास्त नागरिकांनी सक्रिय सहभाग घेतला.

COMMENTS