Homeताज्या बातम्यादेश

वॉशिंग मशिनच्या ड्रायरमध्ये अडकला चिमुकला

अग्निशमन दलाच्या जवानांनी केली सुटका

लहान मुलं कुठेही खेळतात. त्यामुळे घरातील व्यक्तींना त्यांच्यावर सतत लक्ष ठेवायला लागतं. लहान असल्यामुळे त्यांना कोणती गोष्ट त्यांच्यासाठी धोकादाय

कर नाही तर डर कशाला ? किशोरी पेडणेकर 
मोठी बातमी ! पेट्रोल 5 तर डिझेल 3 रुपयांनी स्वस्त : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा
पत्नीशी वाद झाल्याने पतीने २ महिन्याच्या मुलीला दिले विहिरीत फेकून | LokNews24

लहान मुलं कुठेही खेळतात. त्यामुळे घरातील व्यक्तींना त्यांच्यावर सतत लक्ष ठेवायला लागतं. लहान असल्यामुळे त्यांना कोणती गोष्ट त्यांच्यासाठी धोकादायक आहे हे लक्षात येत नाही. यामुळे ते अनेकदा चुकीच्या गोष्टींसोबत खेळण्याचा प्रयत्न करतात आणि अडचणीत सापडतात. थोड्यावेळासाठी पालकांचं लक्ष दुसरीकडे गेलं तरी हे चिमुकले काहीतरी कारनामा करतात. मात्र कधी कधी हे लहान मुलांच्या जीवावरही बेततं. अशीच एक घटना समोर आलीय ज्यामध्ये एक चिमुकला वॉशिंगमशीनमध्ये जाऊन अडकला. हे प्रकरण नेमकं काय आहे याविषी जाणून घेऊया. लहान मुलगा वॉशिंगमशीनच्या ड्रायरमध्ये अडकला. त्याच्या किंचाळण्याचा आवाज आल्यावर महिला धावत त्याच्याकडे गेली. मुलाला वॉशिंगमशीनमध्ये अडकल्याचं पाहून महिला घाबरली. तिनं मुलाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला मात्र तिचा प्रयत्न अपयशी ठरला. मग तिनं आपत्कालिन विभागाला कॉल केला. अग्निशामक दलाचे जवान तिथे पोहोचले. तास भर प्रयत्न केल्यानंतर त्यांनी चिमुकल्याची सुटका केली. या घटनेचा व्हिडीओदेखील समोर आला आहे. जो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओवर अनेक कमेंटही येताना पहायला मिळत आहे. यापूर्वीही अशी बरीच प्रकरणे समोर आली आहेत ज्यामध्ये चिमुकले खेळता खेळता अडचणीत सापडले.

COMMENTS