Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रचाराच्या रणधुमाळीचा आज शेवटचा दिवस

मुंबई ः महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचा शेवटच आणि पाचवा टप्प्यासाठी सोमवारी मतदान होणार आहे, मात्र त्यापूर्वी प्रचाराच्या रणधुमाळीचा आज शनिवारी

चंदन टोळीचा सिरसाळा पोलिसांनी केला पर्दाफाश
अहमदनगर जिल्ह्यात 30 मेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू
रेस्टॉरंटमधील माऊथ फ्रेशनरमुळे ५ जणांना रक्ताच्या उलट्या

मुंबई ः महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचा शेवटच आणि पाचवा टप्प्यासाठी सोमवारी मतदान होणार आहे, मात्र त्यापूर्वी प्रचाराच्या रणधुमाळीचा आज शनिवारी शेवटचा दिवस असून, सर्वच पक्षांनी मुंबईतील लोकसभेच्या 6 जागांवर लक्ष केंद्रीत केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत महायुतीची सभा झाल्यानंतर दुसर्‍या दिवशी म्हणजे शनिवारी पाचव्या टप्प्यातील प्रचाराच्या अखेरच्या दिवशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे तब्बल 4 सभा घेणार आहेत. उद्धव ठाकरे शनिवारी मुंबईतील महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी ईशान्य मुंबई, दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई व उत्तर पश्‍चिम मुंबई या 4 लोकसभा मतदारसंघांत सभा घेणार आहेत. या जागांवर ठाकरे गटाचे संजय दिना पाटील, अनिल देसाई, अरविंद सावंत व अमोल किर्तीकर हे उमेदवार आहेत.

COMMENTS