Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सौर कृषीपंप योजनेचा लाभ घेण्यासाठी थेट महावितरणशी संपर्क साधावा; महावितरणचे आवाहन

अहिल्यानगर : मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी सवलतीच्या दारात सौर कृषी पंप देण्यात येत असून या योजनेचे फॉर्म भरणे वा कोणत्याही

दीपक करगळ यांची 5 हजार किलो आंब्यांची साई प्रसालयात देणगी
समताज स्पोर्टस चॅम्प’ विशेषांकाचे प्रकाशन
साईनगरीत हार-फुलांच्या विक्रीस सुरवात

अहिल्यानगर : मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी सवलतीच्या दारात सौर कृषी पंप देण्यात येत असून या योजनेचे फॉर्म भरणे वा कोणत्याही कामासाठी  महावितरणने प्रतिनिधीची  नियुक्ती केली नसून, योजनेचा लाभ मिळवून देण्याच्या आमिषापोटी कुणीही आर्थिक मागणी केल्यास त्यास बळी न पडता सौरपंपाची दहा टक्के रक्कम भरण्यासाठी केवळ ऑनलाईन पद्धतीचा वापर करावा. तक्रार किंवा शंका असल्यास महावितरणच्या स्थानिक उपविभागीय कार्यालयात संपर्क व तक्रार करावी आणि ग्राहकांनी सतर्क रहावे असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या प्रधानमंत्री कुसुम बी या योजनेच्या आधारे मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेची अंमलबजावणी सुरू आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी महावितरणच्या अधिकृत https://offgridmtsup.mahadiscom.in/AGSolarPumpMTS/ या लिंकवर जाऊन अर्ज सादर करावा तसेच सौरपंपाची लागू असलेली रक्कम भरण्यासाठी केवळ ऑनलाईन पद्धतीचा वापर करावा.
सौरपंपाची उभारणी करण्याकरिता, किंवा किरकोळ साहित्य जसे की, सिमेंट, खडी, वाळू, खड्डे खणणे इत्यादी करिता कोणी मागणी केल्यास महावितरणच्या जवळच्या उपविभागीय कार्यालयात तक्रारीसाठी संपर्क करावा.  अर्जदारास  त्यांनी निवडलेली संबंधित एजन्सी विना मोबदला सौर पंप उभारणी करून देईल.

तसेच महावितरण कंपनी कडून ग्राहकाला ओटीपी (OTP) ची मागणी फोनद्वारे करत नाही. त्यामुळे जर कोणी ओटीपीची मागणी करत असल्यास तो त्यांना देऊ नये व याबाबत उपविभागीय कार्यालयात तक्रार द्यावी. आपले सौरपंप उभारणीचे काम योग्यरीत्या होत असल्याची माहिती घेण्यासाठी महावितरणच्या कक्ष अधिकारी व संबंधित वायरमन, जनमित्र यांचेशी संपर्क करण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे. महावितरणच्या अधिकृत www.mahadiscom.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. 

कुठल्याही योजनेसंदर्भात माहितीसाठी व तक्रारीसाठी वीजग्राहकांनी  नजीकच्या महावितरण कार्यालयांशी संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

COMMENTS