Homeताज्या बातम्यालाईफस्टाईल

वीजबील कमी करण्यासाठी टिप्स

देशाच्या अनेक भागांमध्ये आता उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. उन्हाच्या झळा सर्वत्र बसू लागल्याने सर्वचजण हैराण होत आहेत. त्यामुळे देशातील अनेक मध्य

बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या | LOK News 24
आठ मंदिरांमध्ये चारी करणारी टोळी जेरबंद
संभाजी महाराज जयंती मिरवणुकीत डीजे दणाणला

देशाच्या अनेक भागांमध्ये आता उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. उन्हाच्या झळा सर्वत्र बसू लागल्याने सर्वचजण हैराण होत आहेत. त्यामुळे देशातील अनेक मध्यमवर्गीय कुटुंब एअर कंडिशनरच्या अर्थाच AC च्या मदतीनं गर्मीचा सामना करत आहेत. तर कोणी कूलर आणि पंख्याचा वापर करत आहेत. फ्रीजमधल्या गोष्टीही वाढल्यामुळे त्याचाही वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. पण एकंदरीत काय तर ही सारी उपकरणं आता मोठ्या प्रमाणात वापरली गेल्याने तुमच्या वीज बिलात मोठी वाढ होऊ शकते. पण हेच वीज बिल जर तुम्हाला कमी करायचं असेल तर ते करण्यासाठी तुम्ही काही सोप्या गोष्टी करू शकता. त्याच काही खास टीप्स आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

१. फ्रिज रिकामा असेल तर खूप वीज खर्च होते. त्यामुळे फ्रिजमध्ये नेहमी फळे, भाज्या ठेवा आणि फ्रिज नेहमी नॉर्मल मोडवर ठेवा.

२. अनेकदा आपण वॉशिंग मशिनमध्ये खूप कपडे टाकतो. पण जर कपडे वॉशिंग मशिनच्या क्षमतेपेक्षा जास्त असतील तर तुमचे विजेचे बील जास्त येणारच. त्यामुळे क्षमेतेनुसारच वॉशिंग मशिनमध्ये कपडे टाका.

३. अनेक लोक झोपण्यापूर्वी घरातली लाईट्स ऑन ठेवतात. त्यामुळे विनाकारक बिल वाढते. त्यामुळे गरज नसेल तेव्हा लाईट्स बंद करा. 

४. घरातील बल्पमुळे विजेच्या बिलात भर पडते. त्यामुळे त्याऐवजी सीएफएलचा वापर करा त्यामुळे वीजबिल नक्कीच कमी होईल. झिरो वॉल्टचा बल्पही सुमारे दहा वॉल्टची वीज खर्च होते. त्यामुळे कंप्म्युटर, टी.व्ही. चे पावर बटन गरज नसेल तेव्हा बंद करा.

५. कंप्म्युटर, टी.व्ही., प्लेअर रात्रीच्या वेळेस चालू ठेवल्यास वीजेचे बिल वाढेल. घरातील उपकरणे पॉवर एक्सटेंशनला जोडून घ्या. कारण विजेचा लोड एकदम वाढल्यास उपकरण जळण्याचा धोका कमी होतो.

६. तुमच्याकडे वॉटर हिटर असल्यास नेहमी ४८ डिग्रीवर ठेवा. त्यामुळे वीज कमी खर्च होईल.

७. उन्हाळ्यात एसीचा वापर वाढल्याने बाहेरील वातावरण खूप खराब होते. त्याचबरोबर तुमच्या आरोग्यासाठीही एसीची हवा योग्य नाही. कूलर असल्यास तु्म्हाला हे दोन्ही त्रास टाळता येतील. त्यामुळे गरज असल्यास एसीचा वापर करा अन्यथा कूलर हा उत्तम पर्याय आहे

COMMENTS