Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यभरात दहीहंडीचा थरार

पावसातही उंच-उंच मानवी मनोर्‍यांनी वेधले लक्ष

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यभरात गुरुवारी दहीहंडीचा थरार बघायला मिळाला. त्यातच काल झालेल्या पावसाने शेतकर्‍यांसह, गोविंदाच्या अंगात उत्साह संचारला होत

शांतताप्रिय जपान होतोय हिंसक !
प्रसिद्ध अभिनेत्रीला देहविक्री करताना अटक
चारित्र्याच्या संशयावरून केला पत्नीचा निर्घूण खून;

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यभरात गुरुवारी दहीहंडीचा थरार बघायला मिळाला. त्यातच काल झालेल्या पावसाने शेतकर्‍यांसह, गोविंदाच्या अंगात उत्साह संचारला होता. भिवंडीत भाजपाकडून कपिल पाटील फाउंडेशनच्या वतीने भव्य दहीहंडीचे आयोजन करण्यात आले असून यंदा 17 वे वर्ष आहे. तसेच कोरोना काळात लाखो नागरिकांना जेवणाचे वाटप करुन मोलाचे योगदान देणार्‍या संस्थाच्या हस्ते या दहीहंडीचे उद्घाटन करण्यात आले हे विशेष.
भिवंडीच्या दहीहंडीला केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच सिने अभिनेत्री गदर फेम अमिषा पटेल आदी कलाकार यांची उपस्थिती होती. यावेळी बोलतांना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, सनातन धर्मात गोविंदाला महत्त्व आहे. दहीहंडीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळेच याला राज्य सरकारने खेळाचा दर्जा दिला आहे. इतकेच नाही तर दहीहंडीला आम्ही सुटी देखील जाहीर केली असल्याचे ते म्हणाले. या खेळातून सांघीक भावना तयार होत असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. मुख्यमंत्री शिंदे यांचे दहीहंडी निमित्त भरगच्च कार्यक्रम आहेत. दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 8 ठिकाणी हजेरी लावली आहे. सकाळपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दहीहंडी उत्सवांना भेटी देत आहेत. यामध्ये ठाण्यातील टेंभी नाका दहीहंडी उत्सव, कोपरी, उथळसर, खेवरा सर्कल, संकल्प चौक, किसननगर, बाळकुंभ जकात नाका, वागळे इस्टेट, लुईसवाडी, स्वामी प्रतिष्ठानचा समावेश आहे. तसेच ठाण्यानंतर मुलुंड, ऐरोली, घाटकोपर, कुर्ला, अंधेरी ईस्ट, बोरीवली वेस्ट, कांदिवली वेस्ट या ठिकाणच्या दहीहंडी उत्सवांचा समावेश आहे. त्यापाठोपाठ मीरा भाईंदर, मीरारोड, भुलेश्‍वर रोड, लालबाग, नायगाव, गिरगाव चौपाटी, डोंबिवली, भिवंडी या ठिकाणीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावली.
दरम्यानतरुणाईच्या सळसळत्या उत्साहात व ‘बोल बजरंग बली की जय’च्या जयघोषात मुंबईसह राज्यात दहीहंडीचा थरार रंगला असून मुसळधार पावसातही उंचच उंच मानवी मनोरे रचले जात आहेत. या पार्श्‍वभूमीवर माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या बालेकिल्ल्यात वरळीतील जांबोरी मैदानात मुंबई भाजपतर्फे ‘परिवर्तन दहीहंडी’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. परिवर्तन दहीहंडीचे आयोजन करून भाजपने थेट आदित्य ठाकरे यांना आव्हान दिले आहे. वरळीच्या जांबोरी मैदानातील भाजपच्या परिवर्तन दहीहंडीसाठी तब्बल 660 हून अधिक गोविंदा पथकांनी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी केली आहे. मुसळधार पावसामुळे जांबोरी मैदानात सर्वत्र चिखल पसरला आहे. परंतु या परिस्थितीतही गोविंदांच्या उत्साहाला उधाण आले आहे.

प्रगतीचे थर रचतांना आनंद ः मुख्यमंत्री शिंदे – राज्य प्रगतीच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे, राज्यातील अहंकारचे थर कोसळले असून आणि प्रगतीचे थर रचले जात असल्याचा आनंद असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले असून, त्यांनी थेट उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. मागची दहीहंडी आणि दिवाळी चांगली झाली ना? ही देखील दिवाळी आपल्याला चांगली करायची आहे ना, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोविंदासाठी 10 लाख रुपयांचा विमा काढल्याची माहिती दिली. राज्यात दहीहंडीच्या उत्साहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील सहभाग घेतला.

COMMENTS