Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सर्वोदयाच्या तीन कुस्ती मल्लांची राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड

अकोले :पारनेर तालुक्यातील भाळवणी या ठिकाणी अहमदनगर जिल्हा कुस्तीगीर संघाची निवड चाचणी संपन्न झाली.या निवड चाचणीमध्ये अकोले तालुक्यातील गुरूवर्य र

माहूरच्या रेणुकादेवी मंदिरातील तांबुलला ‘जीआय टॅग’, 3 ते 4 महिन्यांत प्रमाणपत्र मिळणार
मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत
अवैध धंदे चालकांना लातूर पोलिसांचा बसला जोरदार दणका

अकोले :पारनेर तालुक्यातील भाळवणी या ठिकाणी अहमदनगर जिल्हा कुस्तीगीर संघाची निवड चाचणी संपन्न झाली.या निवड चाचणीमध्ये अकोले तालुक्यातील गुरूवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालय राजूर येथील तीन कुस्ती मल्लांची राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यामध्ये इयत्ता दहावीमधील बोर्‍हाडे जयेश गणेश याने 45 किलो वजनगटात तर मुर्तडक सुरज संजय याने 48 किलो वजनगटात सुवर्णपदक मिळविले आहे.त्याचप्रमाणे इयत्ता बारावी मधील दातखिळे प्रतीक एकनाथ याने 51 किलो वजनगटात सुवर्णपदक मिळविले आहे.या सर्व कुस्ती मल्लांनी सुवर्ण कामगिरी करून त्यांची तीन ऑक्टोंबर या दिवशी नाशिक येथे होणार्‍या राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. हे सर्व कुस्ती मल्ल राजूर येथील भारतीय खेळ प्राधिकरण नवी दिल्ली यांनी दत्तक घेतलेल्या ऍड .एम.एन. देशमुख महाविद्यालय येथे साई कुस्ती सेंटर मध्ये प्रशिक्षण घेत आहेत.या सर्व कुस्ती मल्लांना आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच तान्हाजी नरके यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.

COMMENTS