Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रेल्वेच्या लोकलगर्दीचे तीन बळी

मुंबई : रेल्वेच्या लोकलमधून प्रवास करणे म्हणजे जीवघेणा प्रवास होय. हा जीवघेणा प्रवास अनेकांच्या जीवावर बेततांना दिसून येत आहे. गेल्या 5 दिवसांमध्

शिंदे गटाकडून मिलिंद देवरांना राज्यसभेची उमेदवारी
पहिल्याच पावसांत मुंबईची तुंबापुरी
ज्योतिषी वामन रंगनाथ महाजन यांचा सन्मान

मुंबई : रेल्वेच्या लोकलमधून प्रवास करणे म्हणजे जीवघेणा प्रवास होय. हा जीवघेणा प्रवास अनेकांच्या जीवावर बेततांना दिसून येत आहे. गेल्या 5 दिवसांमध्ये या लोकलच्या गर्दीने तिघांचा बळी घेतल्याचे समोर ईले आहे. या बळीनंतरही रेल्वे प्रशासनाला अजूनही जाग आलेली नाही, त्यामुळे रेल्वेच्या लोकल प्रवाशांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी डोंबिवली-मुंब्रा दरम्यान 49 वर्षीय राहुल पुरुषोत्तम अष्टेकर नावाच्या व्यक्तीचा लोकलमधून पडून मृत्यू झाला. मुंब्रा स्टेशनजवळ धावत्या लोकल ट्रेनमधून पडून त्यांचा मृत्यू झाला. मागील पाच दिवसांत तिसर्‍या प्रवाशाचा मृत्यू झाल्याने लोकल गर्दीचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गेल्या आठवड्याभरात डोंबिवली ते मुंब्रा लोकल प्रवासादरम्यान लोकलमधील गर्दीमुळे तीन प्रवासी लोकलमधून पडून त्यांचा मृत्यू झाले आहेत. डोंबिवली रेल्वे स्थानक हे मध्य रेल्वे मार्गावरील प्रचंड गर्दीचे रेल्वे स्थानक आहे. डोंबिवली रेल्वे स्थानकावरून दिवसभरात दोन सव्वा दोन लाख प्रवासी लोकलने ये-जा करतात. प्रवाशांमुळे कोट्यवधी रुपयाचे उत्पन्न डोंबिवली रेल्वे स्थानकाकडून रेल्वेला मिळत असल्याची माहित मिळत आहे. मात्र या मोबदल्यात या रेल्वे स्थानकावर, लोकलमध्ये होणारी गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे कडून केवळ कागदी घोडे नाचवत असल्याचा प्रकार दिसून येत आहे, असा रोष प्रवाशांकडून व्यक्त केला जात आहे. रेल्वे प्रवाशांकडून डोंबिवलीहून सुटणार्‍या लोकल गाड्यांमध्ये वाढ करण्याची मागणी आहे. लोकलच्या फेर्‍या वाढवण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. मात्र या मागणीकडे रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करत आहे, असा आरोप प्रवाशांकडून केला जात आहे.

COMMENTS