Homeताज्या बातम्यादेश

पुंछमध्ये तीन दहशतवाद्यांना अटक

10 किलो आयईडी जप्त ः एक भारतीय जवान जखमी

श्रीनगर/वृत्तसंस्था ः  जम्मू-काश्मीरच्या पुंछ सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी सीमा ओलांडून घुसखोरी केलेल्या

गुजरातमध्ये पूल कोसळून 2 बाईकसह ट्रक थेट नदीत
नक्षल्यांवर दया-माया नको… सडेतोड उत्तर देण्याचे मंत्री एकनाथ शिंदेंचे आदेश
वाशी विभागात मागील दोन दिवसांपासून पाणी नसल्यामुळे नागरींकांचे प्रचंड हाल

श्रीनगर/वृत्तसंस्था ः  जम्मू-काश्मीरच्या पुंछ सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी सीमा ओलांडून घुसखोरी केलेल्या तीन दहशतवाद्यांना ताब्यात घेतले. या दहशतवाद्यांचा भारतीय सैन्यांसोबत चकमक झाली. यामध्ये लष्कराच्या जवानासह दोन दहशतवादी जखमी झाले. लष्कराने दहशतवाद्यांकडून आयईडी आणि शस्त्रास्त्रांसह ड्रग्ज जप्त केले आहेत.
तीनही दहशतवादी मंगळवारी मध्यरात्री खराब हवामान आणि पावसाचा फायदा घेत भारतीय सीमेत घुसखोरीचा प्रयत्न करत होते. कुंपण ओलांडून जाणार्‍या तीन दहशतवाद्यांवर लष्कराच्या जवानांनी गोळीबार केला. लष्कराने त्यांच्याकडून 10 किलो आयईडी, एके-47 आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि ड्रग्ज जप्त केले आहेत. गोळीबारात जखमी झालेल्या एका दहशतवाद्यावर पुंछ येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. परिसरात सर्च ऑपरेशन सुरू आहे. पुंछमधील गुलपूर भागात नियंत्रण रेषेजवळ लष्कराने संशयास्पद हालचाली पाहिल्या. यानंतर जवानांनी शोधमोहीम सुरू केली. लष्कराची कारवाई पाहून दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला, प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात एक घुसखोर जखमी झाला. मोहम्मद फारुख (26), मोहम्मद रियाझ (23) आणि मोहम्मद जुबेर (22) अशी घुसखोरांची नावे आहेत. सर्व करमारहा येथील रहिवासी आहेत. फारुखच्या पायात गोळी लागली आहे. लष्कराच्या म्हणण्यानुसार या तिघांना सीमेपलीकडून शस्त्रास्त्र आणि ड्रग्जची खेप मिळाली होती. सैनिकांनी त्यांना अडवले तेव्हा ते तस्करीचा प्रयत्न करत होते

COMMENTS