Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कराड-पाटण मार्गावर ओमनी-दुचाकी धडकेत तिघे गंभीर

कराड / प्रतिनिधी ः कराड-पाटण मार्गावर काल रात्री अकराच्या सुमारास ओमनी कार व दुचाकीची समोरासमोर धडक झाली. त्यामध्ये ओमनी चालक, दुचाकी चालक व पाठी

लोकशाहीच्या वृध्द्धीसाठी तरुणांनी मतदान करावे : जीवन गलांडे
प्रकाश कामगारांचा एक दिवसासाठी अन्नत्याग; पोलिसासह आरोग्य अधिकार्‍यांच्या बेकायदेशीर कारवाई विरोधात उपोषण
सातार्‍यात सुपर मार्केटमधील वाईन विक्री विरोध व्यसन मुक्त युवक संघाचे दंडवत-दंडुका आंदोलन

कराड / प्रतिनिधी ः कराड-पाटण मार्गावर काल रात्री अकराच्या सुमारास ओमनी कार व दुचाकीची समोरासमोर धडक झाली. त्यामध्ये ओमनी चालक, दुचाकी चालक व पाठीमाने बसलेला एकजण असे तीघे गंभीर जखमी झाले. ओमनी चालक असीफ आजीज मुल्ला (वय 31, रा. कार्वे नाका कराड), विशाल प्रकाश जाधव (28, शेणोली) व सुनिल दिनकर चव्हाण 34, कालवडे) अशी जखमींची नावे आहेत. संबंधितांना उपचारासाठी कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कराड-पाटण मार्गावर काल रात्री अकराच्या सुमारास पाटणहुन कराकडे निघालेली ओमनी कार (एमएच 12 एएन 8490) आणि कराडवरुन पाटणकडे निघालेली दुचाकी यांच्यात आरटीओ कार्यालयापुढील बाजुस समोरासमोर धडक झाली. दोन्ही वाहनांच्या धडकेचा मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. अपघातात ओमनी गाडीचा चालकाकडील बाजूचे मोठे नुकसान झाले आहे. तर दुचाकीचा पुढील सर्व भाग तुटला आहे. दरम्यान, अपघातात ओमनी चालकासह दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले. तेथे जमलेल्या नागरीकांनी संबंधित जखमींना तातडीने कृष्णा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान कराड शहर पोलीस ठाण्यातील अपघात विभागाचे हवालदार जाधव, धीरज चतुर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेवुन वाहने बाजूला काढून वाहतूक सुरळीत केली.

COMMENTS