Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बोगस वाहन नोंदणी प्रकरणी तीन आरटीओ अधिकार्‍यांसह 9 आरोपींना अटक

मुंबई ः राज्यातील विविध जिल्ह्यात बोगस वाहन नोंदणी प्रकरण समोर आले असून, यामध्ये आरटीओतील अधिकार्‍यांचा समावेश असल्यामुळे खळबळ उडाली आहे. विविध र

रोजगार निर्मितीत महाराष्ट्र आघाडीवर
अमरावतीमध्ये सिटी बसने चौघांना चिरडले
वसंत रांधवण राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

मुंबई ः राज्यातील विविध जिल्ह्यात बोगस वाहन नोंदणी प्रकरण समोर आले असून, यामध्ये आरटीओतील अधिकार्‍यांचा समावेश असल्यामुळे खळबळ उडाली आहे. विविध राज्यांतून चोरण्यात आलेल्या ट्रक, हायवा, ट्रेलर यासारख्या वाहनांच्या चेसिस व इंजिन क्रमांकात फेरबदल करून त्यांची परराज्यात नोंदणी करून या वाहनांची महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत पुनर्नोंदणी करण्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. या वाहनांची विक्री करणार्‍या रॅकेटचा नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने पर्दाफाश केला असून या कारवाईत गुन्हे शाखेने एकूण 5 कोटी 50 लाख रुपये किमतीची 29 वाहने जप्त करून या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या 9 आरोपींना अटक केली आहे. त्यामध्ये 3 आरटीओ अधिकार्‍यांचा समावेश आहे.
या रॅकेटमध्ये सहभागी असलेले आरोपी विविध राज्यांतून ट्रक, हायवा, ट्रेलर यासारख्या वाहनांची चोरी करून त्याच्या चेसिस व इंजिन क्रमांकात फेरबदल करून या वाहनांची अरुणाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश, मणिपूर, नागालँड या राज्यांत नोंदणी करत होते. या गुन्ह्यात आंतरराज्य टोळीचा समावेश असल्याचे निदर्शनास आल्यामुळे गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या तपासात जावेद अब्दुला शेख ऊर्फ मणियार हा या गुन्ह्यातील मुख्य आरोपी असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी जावेद याला सहकार्य करणार्‍या 5 आरोपींना नागपूर, अमरावती धुळे, बुलडाणा, सुरत, छत्रपती संभाजीनगर या भागात शोध घेऊन त्यांनादेखील या गुन्ह्यात अटक केली आहे. गुन्हे शाखेच्या वतीने उघड करण्यात आलेल्या बनावट वाहन नोंदणीच्या प्रकरणाचे धागेदोरे मोठ्या अधिकार्‍यांपर्यंत जाऊन पोहचणार आहेत. त्यामुळे गुन्हे शाखेने खोलवर तपास केल्यास यामध्ये मोठ्या अधिकार्‍यांचा सहभाग उघड होऊ शकतो, तर परिवहन विभागातील हा सर्वात मोठा घोटाळा पुढे येण्याची शक्यतासुद्धा एका परिवहन अधिकार्‍यांनी बोलून दाखवली आहे. बनावट वाहन नोंदणीची सर्वात पहिली केस वसई आरटीओ कार्यालयात उघड झाली होती. मात्र, काही कालावधीमध्ये त्यामध्ये गुन्हे शाखेने खोलवर जाऊन तपास न केल्याने प्रकरण बंद झाले होते. मात्र, त्यानंतर आता नुकतेच अंधेरी आरटीओ कार्यालयात अशाच प्रकारचे प्रकरण पुढे आल्यानंतर नवी मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नागपूरपर्यंत जाऊन खोलवर तपास करून आरोपींनी अटक केली आहे.

COMMENTS