ऊसतोड मजुरांच्या धान्य चोरी प्रकरणी पती-पत्नीसह तिघे ताब्यात

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ऊसतोड मजुरांच्या धान्य चोरी प्रकरणी पती-पत्नीसह तिघे ताब्यात

कर्जत/प्रतिनिधी : परजिल्ह्यातून कर्जत तालुक्यात ऊसतोडणीसाठी आलेल्या ऊसतोड मजुरांच्या कोपींची कुलपे तोडून बाजरी व इतर धान्य इंडिका गाडीत भरून पलायन कर

सुरेगावात विविध उपक्रमांनी मतदान जनजागृती
माहूरच्या रेणुका मातेचे साक्षात रूप म्हणजे बालमटाकळीची श्री बालांबिका देवी (Video)
केंद्र शासनाने साखर निर्यातीचा निर्णय घ्यावा ः आमदार आशुतोष काळे

कर्जत/प्रतिनिधी : परजिल्ह्यातून कर्जत तालुक्यात ऊसतोडणीसाठी आलेल्या ऊसतोड मजुरांच्या कोपींची कुलपे तोडून बाजरी व इतर धान्य इंडिका गाडीत भरून पलायन करणाऱ्या चोरट्यांच्या कर्जत पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्यासोबत असलेल्या अन्य दोन साथीदारांवरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींनी शेळ्या चोरीचीही कबुली दिली आहे.
अमोल रमेश सुलताने, मूळ रा. किनखेड, ता. मूर्तिजापूर, जि. अकोला, हल्ली राहणार कनगर, ता. राहुरी व गिता अमोल सुलताने अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांचे साथीदार सुनिल सुभाष बर्डे, अनिल ऊर्फ भिमराज निकम (सर्व रा.राहुरी ) आदींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येसवडी गावच्या शिवारात ऊसतोडणीसाठी आलेल्या आप्पा धनंजय भिल्ल (रा. काकडदा, ता.शहादा जि.नंदुरबार ) या ऊसतोड मजुराच्या बंद कोपीचे कुलूप तोडून आरोपींनी कोपीतील १०० किलो बाजरी इंडिका (एमएच ४२, ए १४११) गाडीत भरून घेऊन जात असताना पोलिसांनी अमोल सुलताने, गिता सुलताने या दोन आरोपींना राशीन येथे ताब्यात घेतले. आरोपींवर कलम ४५४, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
अटक आरोपींना कर्जत न्यायालयात हजर करून त्यांची पोलीस कस्टडी रिमांड घेवुन पोलीस कस्टडी रिमांड मुदतीत अधिक तपास केला असता अमोल सुलताने व अनिल ऊर्फ भिमराज निकम यांनी कर्जत तालुक्यातील गणेशवाडी येथील दोन ठिकाणावरून शेळ्यांची चोरी केल्याबाबत कबुली दिल्याने कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी अमोल याच्यावर मूर्तिजापूर शहर आणि मूर्तिजापूर ग्रामीण या ठिकाणी यापूर्वीचे १२ गुन्हे दाखल आहेत. घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल काळे, तुळशीराम सातपुते हे करत आहेत.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे, भगवान शिरसाठ, सहाय्यक फौजदार तुळशीराम सातपुते, पोलीस हेड कॉन्स्टेबल मारुती काळे, आण्णासाहेब चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल सचिन वारे, भाऊसाहेब काळे, गणेश भागडे, संपत शिंदे, अर्जुन पोकळे आदींच्या पथकाने केली आहे.

COMMENTS