Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विभुतवाडी येथील भीषण अपघातात सातार्‍यातील तिघांचा मृत्यू

आटपाडी / प्रतिनिधी : विभूतवाडी (ता. आटपाडी) येथे कराड-पंढरपूर महामार्गावर ट्रक आणि छोटा टेम्पो या दोन वाहनांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात तीन

जागतिक एड्स दिनानिमित्त सातारा शहरात प्रबोधनपर रॅली
लवकरच राज्य परिवहन विभागाच्या गाड्यांचे 142 महिलांच्या हाती स्टेअरिंग
काळम्मादेवी देवस्थानास राज्य शासनाकडून तिर्थस्थानचा ब वर्ग दर्जा प्राप्त : देवराज पाटील

आटपाडी / प्रतिनिधी : विभूतवाडी (ता. आटपाडी) येथे कराड-पंढरपूर महामार्गावर ट्रक आणि छोटा टेम्पो या दोन वाहनांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात तीनजण ठार झाले. महेश फडतरे (वय 27) गणेश फडतरे आणि निशांत फडतरे (सर्व रा. पुसेगांव, ता. खटाव, जि. सातारा) अशी मृतांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, गुरुवारी रात्री कराड-पंढरपूर महामार्गावर विभूतवाडी गावाच्या पश्‍चिमेला सातारा जिल्ह्याकडे जाणार्‍या रस्त्यावर ओढा आणि वळण रस्त्यावर हा अपघात झाला. कोरेगाव येथून छोटा टेम्पो मालाची डिलिव्हरी करून परत निघाला होता. सातारा येथून दिघंचीकडे बोरवेल ट्रक निघाला होता. यावेळी या दोन वाहनांची समोरासमोर धडक झाली.
या भीषण अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. अपघातग्रस्त वाहनांतील जखमींना ग्रामस्थांनी बाहेर काढले. गंभीर जखमींना तत्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मायणी येथील हॉस्पिटलमध्ये घेऊन जाताना एकाचा मृत्यू झाला. दुसर्‍याचा आटपाडी ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला. निशांत फडतरे हा सातारा येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
अपघातात मयत झालेले तिघेजण पुसेगावचे आहेत. शेतकरी कृषी यंत्र एजन्सीचे साहित्य पोहोचवुन ते परत निघाले असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. गुरुवारी रात्री अपघातग्रस्त वाहनांतील जखमींना बाहेर काढताना एका वाहनातून ग्रामस्थांना 32 हजार रुपयांची रक्कम सापडली. मदती दरम्यान सापडलेली ही रक्कम ग्रामस्थांनी वाहन मालकाला परत दिली. या कृतीतून विभूतवाडी ग्रामस्थांकडून माणुसकीचे दर्शन दिसून आले.

COMMENTS