Homeताज्या बातम्यादेश

राजधानीत एकाच कुटुंबातील तिघांचा होरपळून मृत्यू

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. आदर्श नगर परिसरातील दिल्ली मेट्रोच्या कर्मचार्‍यांसाठी असलेल्या वसाहतीत मध्

कर्तव्यपथावर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा जयघोष
राजधानीत 10 कोटींच्या हेरॉइनसह दोघांना अटक
धुक्यामुळे राजधानीत हवाई व रेल्वे वाहतूक विस्कळीत

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. आदर्श नगर परिसरातील दिल्ली मेट्रोच्या कर्मचार्‍यांसाठी असलेल्या वसाहतीत मध्यरात्री भीषण आग लागून एका कुटुंबातील पती, पत्नी आणि त्यांच्या लहान मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अजय, त्यांची पत्नी नीलम आणि दहा वर्षांची मुलगी जान्हवी हे तिघेही रात्री एका खोलीत झोपले असताना अचानक आग भडकली. मंगळवारी रात्री साधारण 2.39 वाजता या घटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. माहिती मिळताच सहा अग्निशमन वाहनांना घटनास्थळी रवाना करण्यात आले.
ही आग इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील एका घरात लागल्याचे स्पष्ट झाले. घरातील साहित्याने अचानक पेट घेतल्याने आगीने काही क्षणांतच रौद्र रूप धारण केले. अग्निशमन दलाने इमारतीत प्रवेश केल्यानंतर एका खोलीत तिघांचे जळालेले मृतदेह आढळून आले. ही दृश्ये अत्यंत विदारक होती. सुमारे चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर सकाळी 6.40 वाजता आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले. आग विझवताना अग्निशमन कर्मचारी राकेश यांच्या हाताला दुखापत झाली. त्यांना तत्काळ जगजीवन राम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून प्राथमिक उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे. या घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शॉर्ट सर्किट, घरगुती उपकरणातील बिघाड किंवा अन्य कोणते कारण यामागे आहे का, याचा तपास पोलीस आणि अग्निशमन विभाग संयुक्तपणे करत आहेत. अचानक घडलेल्या या दुर्घटनेने परिसरातील रहिवासी हादरून गेले असून मृत कुटुंबीयांप्रती हळहळ व्यक्त केली जात आहे.

COMMENTS