महिलांसाठी तीन नवीन योजना ; 2 लाख अंगणवाडयांचा विस्तार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महिलांसाठी तीन नवीन योजना ; 2 लाख अंगणवाडयांचा विस्तार

नवी दिल्ली/प्रतिनिधी : या अर्थसंकल्पात महिलांसाठी तीन नवीन योजना सुरू करण्यात येणार असून, देशातील 2 लाख अंगणवाडयांचा विस्तार करणयात येणार आहे. याविषय

पत्नीच्या शिक्षणासाठी कर्जबाजारी झाला; नर्स होताच गेली दुसऱ्यासोबत पळून
ऐश्वर्याच्या चाहत्याचा अभिषेकला सल्ला
रोहित शर्माची अमेरिकेत क्रिकेट अकॅडमी

नवी दिल्ली/प्रतिनिधी : या अर्थसंकल्पात महिलांसाठी तीन नवीन योजना सुरू करण्यात येणार असून, देशातील 2 लाख अंगणवाडयांचा विस्तार करणयात येणार आहे. याविषयी बोलतांना अर्थमंत्री सीतारामण म्हणाल्या की, आमच्या सरकारने लाभ देण्यासाठी महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या मिशन शक्ती, मिशन वात्सल्य, सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 सारख्या योजनांमध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा केल्या आहेत. 2 लाख अंगणवाड्या सक्षम अंगणवाड्यांमध्ये श्रेणीसुधारित केल्या जातील. अर्थमंत्री म्हणाल्या, महिला आणि बालकांच्या एकात्मिक विकासासाठी तीन योजना सुरू करण्यात आल्या आहेत. बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी दोन लाख अंगणवाड्या अधिक चांगल्या केल्या जाणार आहेत. मानसिक आरोग्य समुपदेशनासाठी राष्ट्रीय टेलि मानसिक आरोग्य कार्यक्रम सुरू केला जाईल. निर्मला सीतारामन म्हणाल्या की, नॅशनल डिजिटल हेल्थ इकोसिस्टमसाठी खुले व्यासपीठ सुरू केले जाईल. याद्वारे आरोग्य पुरवठादारांसाठी डिजिटल रजिस्ट्री, विशिष्ट आरोग्य ओळख आणि आरोग्य सुविधांमध्ये सार्वत्रिक प्रवेश साध्य केला जाईल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की इमर्जन्सी क्रेडिट लाइन गॅरंटी स्कीम मार्च 2023 पर्यंत वाढवली जाईल. हमी कवच 50,000 कोटी रुपयांवरून एकूण 5 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवले जाईल.

COMMENTS