औरंगाबाद : मागील दीड महिन्यात तब्बल 58 महिला व तरूणी गायब झालेल्या असतानाच त्यात आणखी तीन अल्पवयीन मुलींची भर पडली आहे. या तीन मुलींचे अपहरण करण्यात
औरंगाबाद : मागील दीड महिन्यात तब्बल 58 महिला व तरूणी गायब झालेल्या असतानाच त्यात आणखी तीन अल्पवयीन मुलींची भर पडली आहे. या तीन मुलींचे अपहरण करण्यात आल्याचा संशय त्यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीत व्यक्त केला आहे. जवाहरनगरातील नाथनगर येथून एका 14 वर्षीय, तर शरणापूर येथून 16 व 17 वर्षीय अशा दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण झाले आहे.
याप्रकरणी जवाहरनगर आणि दौलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. मागील काही महिन्यांपासून औरंगाबाद शहर हद्दीतून महिला, तरुणी व अल्पवयीन मुली गायब होण्याच्या घटना सातत्याने समोर येत आहे. मागील दीड महिन्यात तब्बल 58 महिला व तरूणी शहराच्या विविध भागांतून गायब झालेल्या आहे. पोलिस तपासातून एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला व मुली का गायब होत आहेत, याचे उत्तर मात्र अद्याप समोर आलेले नाही. महिला व मुलींना पळवणारे रॅकेट तर शहर परिसरात सक्रीय नाही ना? असा प्रश्न या घटनांमुळे उपस्थित होत आहे. दरम्यान, जवाहरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नाथनगर येथून 11 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास 14 वर्षीय मुलगी मैत्रिणीच्या घरी जाऊन येते, असे सांगून निघून गेली, ती अद्याप परतलेली नाही. वडील सुनील भगवान मगरे रा. बालाजीनगर नाथनगर यांनी अज्ञात इसमाने अपहरण केल्याची तक्रार जवाहरनगर पोलीस ठाण्यात दिली आहे. दुसर्या घटनेत भांगसी माता गडाजवळ शरणापूर येथे राहणार्या महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, 9 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा ते सात वाजेच्या सुमारास त्या पतीसह साजापूर येथे दवाखान्यात गेल्या होत्या. तेव्हा अज्ञात इसमाने त्यांच्या 16 व 17 वर्षे वयाच्या दोन मुलींना फुस लावून पळून नेले. सोळा वर्षीय मुलीच्या अंगात पांढर्या रंगाचा टॉप आणि काळ्या लग्नाची लेगिन्ज, केशरी रंगाचा स्टोल आहे. पायात निळ्या रंगाची चप्पल तर शिक्षण सातवीपर्यंत झाले आहे. सतरा वर्षीय मुलीच्या अंगात लाल रंगाचा टॉप, निळ्या रंगाची जीन्स व पांढर्या रंगाचा स्टोल परिधान केलेला आहे. तिचे नववीपर्यंत शिक्षण झालेले आहे.
COMMENTS