Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

म्हैसाळ आत्महत्या प्रकरणी आणखी तिघांना अटक; अटक आरोपींची संख्या पोहचली 18 वर; आणखी सात जण पोलिसांच्या रडारवर

सांगली / प्रतिनिधी : म्हैसाळ येथील सामूहिक आत्महत्या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी बुधवारी आणखी तिघा संशयितांना अटक केली आहे. एकूण 25 पैकी 18 जणांना आताप

इस्लामपूरमध्ये राष्ट्रवादी-शिवसेनेत किर-किर; भाजपमध्ये उकळ्या
ओबीसींच्या न्यायहक्कासाठी आ. गोरे यांना वंचित बहुजन आघाडीने मागितला राजीनामा
शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीमध्ये 15 कोटींची वाढ; महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या पाठपुराव्याला यश

सांगली / प्रतिनिधी : म्हैसाळ येथील सामूहिक आत्महत्या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी बुधवारी आणखी तिघा संशयितांना अटक केली आहे. एकूण 25 पैकी 18 जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. उर्वरित सात संशयितांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून देण्यात आली आहे. शामगोंदा कलगोंडा पाटील (वय 54, रा. गाडवे चौक, मिरज), राजेश गणपती होटकर (वय 54, रा. विद्यानगर, विश्रामबाग) आणि अण्णासो तात्यासो पाटील (वय 69, रा. म्हैसाळ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
खासगी सावकारांच्या त्रासाला कंटाळून म्हैसाळ येथील पशू वैद्यकीय डॉ. माणिक वनमोरे व पोपट वनमोरे या दोघा सख्ख्या भावांनी आपल्या कुटुंबियांसह विष प्राशन करून सामुहिक आत्महत्या केली. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण सांगली जिल्ह्यासह राज्यात खळबळ माजली आहे. घटनास्थळी पोलिसांना दोन चिठ्ठ्या मिळाल्या आहेत. त्यामध्ये वनमोरे बंधूंनी 25 खासगी सावकारांची नावे व त्यापुढे काही सांख्यिकी आकडेवारी नमूद केली आहे. सापडलेल्या चिठ्ठीच्या अनुषंगाने पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करून सर्व सावकारांचा शोध सुरू केला आहे. यासाठी सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि कर्नाटक राज्यात पोलिसांची सात पथके रवाना झाली आहेत.
मिरज ग्रामीण पोलिसांनी आतापर्यंत नंदकुमार रामचंद्र पवार, राजेंद्र लक्ष्मण बन्ने, अनिल लक्ष्मण बन्ने, खंडेराव केदारराव शिंदे, डॉ. तात्यासो अण्णाप्पा चौगुले, शैलेंद्र रामचंद्र धुमाळ, प्रकाश कृष्णा पवार, संजय इराप्पा बागडी, अनिल बाळू बोराडे, पांडुरंग श्रीपती घोरपडे, विजय विष्णू सुतार, शिवाजी लक्ष्मण कोरे, रेखा तात्यासो चौगुले, गणेश ज्ञानु बामणे, आणि शुभदा मनोहर कांबळे या 15 संशयीत सावकारांना अटक केली आहे. बुधवारी शामगोंदा कलगोंडा पाटील, राजेश गणपती होटकर आणि अण्णासो तात्यासो पाटील या तिघांना अटक करण्यात आली. त्यामुळे एकूण अटक केलेल्या आरोपींची संख्या 18 झाली आहे. अद्यापही अन्य 7 संशयितांचा शोध सुरू असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.

COMMENTS