Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एकाच कुटुंबातील तिघांनी गळफास घेऊन आत्महत्या

औरंगाबाद प्रतिनिधी ः एकाच कुटुंबातील तिघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळळजनक घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. मृतांमध्ये पती - पत्नी आणि चार वर

चिट्ठी लिहून विद्यार्थिनीची आत्महत्या
मासिक पाळीच्या त्रासामुळे १४ वर्षीय मुलीची आत्महत्या
पुण्यात पोलिसाची चौकीत डोक्यात गोळी घालून आत्महत्या

औरंगाबाद प्रतिनिधी ः एकाच कुटुंबातील तिघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळळजनक घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. मृतांमध्ये पती – पत्नी आणि चार वर्षीय मुलीचा समावेश आहे. मोहन प्रताप डांगर ( 28 ), पुजा मोहन डांगर ( 24 ) आणि श्रेया ( 4 ) अशी मृतांची नावे आहेत. कौटुंबिक वादातून कुटुंबाने आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
सातारा पोलिस स्टेशन हद्दीत वळदगाव येथे उपसरपंच संजय झळके यांच्याकडे डांगर कुटुंब भाड्याच्या खोलीत राहते. मोहन प्रताप डांगर ( 28 ), पुजा मोहन डांगर ( 24 ) आणि श्रेया ( 4 ) हे तिघे येथे राहत. रात्री या दामपत्त्यामध्ये भांडण झाल्यानंतर प्रथम मुलीला गळफास देऊन नंतर पती पत्नीने गळफास घेतला. आज सकाळी ही घटना उघडकीस आली.
याप्रकरणी सातारा पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद होत आहे. गावचे उपसरपंच संजय झळके यांच्या खोलीत हे कुटुंब भाड्याने राहत होते. पुजाचे माहेर वलदगाव आहे, त्यामुळे तिचे आणि मुलगी श्रेया चे नेहमी आजी आजोबा कडे जाणे येणे होते. श्रेया रोज सकाळी आजी आजोबांकडे जात असे. ती आज सकाळी आजीकडे आली नाही. त्यामुळे आजी पूजाच्या घरी आली तेव्हा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
गुरुवारी रात्री कुटुंब जेवण करून झोपले. त्यानंतर रात्री उशिरा हा प्रकार घडल्याचे बोलले जाते. या प्रकरणी सातारा पोलिस स्टेशनमध्ये आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली.

COMMENTS