बुलडाणा : जिल्ह्यातील अमडापूर येथे शुक्रवारी रात्री हिट अॅण्ड रनच्या घटनेत तीन तरूणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या अपघातामध्ये चिखलीवरुन उ
बुलडाणा : जिल्ह्यातील अमडापूर येथे शुक्रवारी रात्री हिट अॅण्ड रनच्या घटनेत तीन तरूणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या अपघातामध्ये चिखलीवरुन उदयनगर कडे जाणार्या तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही धडक एवढी जोरदार होते की, हे तरुण जागेवरच मृत पावले. या घटनेनंतर अज्ञात वाहन चालकांने घटनास्थळावरून पळ काढला. आता या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून वाहनाचा शोध सुरू आहे.
बुलडाणा जिल्ह्यामध्ये हृदय पिळवटून टाकणारी ही घटना समोर आली आहे. शुक्रवारी रात्री भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकी वरील तीन तरुणांचा जागच मृत्यू झाला. या मृतांमध्ये पंचवीस वर्षे वयाचा प्रतीक भुजे, 26 वर्षे वयाचा प्रथमेश भुजे आणि सौरभ शर्मा या तीन तरुणांचा समावेश आहे.
COMMENTS