Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

समृद्धीवरील अपघातात तिघांचा मृत्यू

कोकमठाण शिवारात अपघात ः मृतांमध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश

अहमदनगर/प्रतिनिधी ः समृद्धी महामार्गाचे उद्घाटन झाल्यापासून या महामार्गावरील अपघातांची मालिका काही केल्या थांबतांना दिसून येत नाही.  समृद्धी महाम

अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ गावातील तिघा तरुणांवर एकाच दिवशी काळाचा घाला
कल्याण स्थानकात एक्स्प्रेस पकडताना प्रवाशांचा अपघात, एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी
गणेश भक्तांच्या कारला शिवशाही बसची टक्कर

अहमदनगर/प्रतिनिधी ः समृद्धी महामार्गाचे उद्घाटन झाल्यापासून या महामार्गावरील अपघातांची मालिका काही केल्या थांबतांना दिसून येत नाही.  समृद्धी महामार्ग सुरु झाल्यापासून अनेक कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून, समृद्धी महामार्गावरील अपघातात जालना जिल्ह्यातील तिघांचा समावेश आहे. विशेष म्हणजे मृतांमध्ये एकाच कुटुंबातील एका चिमुरडीसह तिघांचा समावेश आहे.
कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण शिवारात जीप आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 3 जण जागीच ठार झाले आहेत, तर 5 जण जखमी आहेत. शुक्रवारी पहाटेच्या दरम्यान हा अपघात झाला. अपघातातील मृतांमध्ये पती, पत्नी आणि दीड वर्षांच्या मुलीचा समावेश आहे. मृत जालना जिल्ह्यातील मंठा गावचे रहिवासी आहेत. संतोष अशोक राठोड (35) त्यांची पत्नी वर्षा संतोष राठोड (29) आणि मुलगी अवनी संतोष राठोड दीड वर्ष अशी मयतांची नावे आहे.  संतोष राठोड भावाच्या लग्नासाठी जालना येथे मूळगावी आले होते. लग्न झाल्यानंतर मुंबईच्या विरार येथे परतत असताना हा अपघात झाला. लग्नाच्या तिसर्‍याच दिवशी झालेल्या अपघातात नवरदेव कृष्णा राठोड (27) आणि त्याची पत्नी कोमल राठोड (19) हे देखील जखमी झाले आहे. संतोषची आई बताबाई राठोड (65) यांच्यावर उपचार सुरू मिळालेल्या माहितीनुसार जीपने टेम्पोला मागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की जीपच्या पुढच्या भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. दरम्यान कोपरगाव शहर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मयतांचे शव शवविच्छेदनासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवले आहे.

COMMENTS