Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तळेगाव ढमढेरेजवळील अपघातात तिघांचा मृत्यू

पुणे ः जिल्ह्याच्या तळेगाव ढमढेरे सोमवारी जवळ दुपारी झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेत अन्य तीन जण गंभीर जखमी झाले

कंटेनरने एकाच कुटुंबातील 5 जणांना चिरडले
पुण्याहून रिसोड कडे प्रवाशी घेऊन जाणाऱ्या बसचा अपघात
गुजरातमध्ये कार-बसच्या धडकेत नऊ जणांचा मृत्यू

पुणे ः जिल्ह्याच्या तळेगाव ढमढेरे सोमवारी जवळ दुपारी झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेत अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांची प्रकृती देखील चिंताजनक असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
याबाबतची मिळालेली माहिती अशी-माल वाहतूक गाडी आणि कार यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाल्याने हा भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. पोलिसांनी आणि घटनास्थळावरुन दिलेल्या माहितीनूसार या अपघातामध्ये अनिता बोरुडे, योगिता बोरुडे आणि राजू शिंदे यांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. या अपघातात कारमधील एक 17 वर्षीय तरुणी गंभीर जखमी झाली आहे. तिची प्रकृती चिंताजनक बनली आहे. दरम्यान माल वाहतुकीमधील दोन जणांची देखील चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

COMMENTS