Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एसटी बस आणि चारचाकी वाहनाच्या अपघातात तिघांचा मृत्यू

जामखेड शहराजवळ अपघात : देवदर्शनावरुन परतणार्‍या तरुणांवर काळाचा घाल

जामखेड ः जामखेड शहराजवळ खर्डा रोडवरील पेट्रोलपंपा जवळ देवदर्शनाहून परतणार्‍या तरुणांच्या चारचाकी वाहन व एस टी बसच्या झालेल्या भीषण अपघातात तीन जण

बस आणि दुचाकीचा भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू.
मोटारसायकल इन्व्हो अपघात तीन गंभीर जखमी
भीषण अपघातात माय-लेकाचा जागीच मृत्यू

जामखेड ः जामखेड शहराजवळ खर्डा रोडवरील पेट्रोलपंपा जवळ देवदर्शनाहून परतणार्‍या तरुणांच्या चारचाकी वाहन व एस टी बसच्या झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. अक्कलकोट व तुळजापूर येथुन देवदर्शन करुन पततत असतांना जामखेड जवळ हा भीषण अपघात झाला आहे. अपघातील पाचहीजण नगर तालुक्यातील वडगाव गुप्ता या गावचे रहिवासी आहेत.
यामध्ये विजय गंगाधर गव्हाणे, वय 24 वर्षे, पंकज सुरेश तांबे, वय 24 वर्षे, दोघे रहाणार वडगाव गुप्ता ता. नगर हे मयत झाले आहेत. या बाबत अधिक माहिती अशी की कोपरगाव डेपोची एम 09. एफ.एल 1027 या क्रमांकाची शिर्डी हैद्राबाद ही बस  बस चालक सचिन विष्णू राऊत हे प्रवाशांना घेऊन हैदराबाद कडे चालले होते. तर अक्कलकोट व तुळजापूर येथुन देवदर्शन करुन पाच तरुण चार चाकी वाहन क्र. एम एच 16 ए. टी. 6492 या गाडीने आपल्या नगर तालुक्यातील वडगाव गुप्ता या गावी चालले होते. अपघातील पाच जखमींना तातडीने जामखेड येथील खासगी रुग्णालयात प्रथमोपचार  केले मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी अहमदनगर येथे हलवण्यात आले होते. मात्र रस्त्यातच विजय गंगाधर गव्हाणे वय 24 वर्षे व पंकज सुरेश तांबे वय 24 दोघेही रा. वडगाव गुप्ता या दोघांचा मृत्यू झाला. तर मयुर संतोष कोळी वय 18, सचिन दिलिप गीते वय 30 व अमोल बबन डोंगरे वय 28 रा तिघे राहणार वडगाव गुप्ता ता. नगर हे तीन जण गंभीर जखमी झाले असल्याने त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र अहमदनगर येथे तिसरा मृत्यू झाल्याचे समजले. घटनेची माहिती समजताच रात्रीच्या सुमारास जामखेड पोलिस स्टेशनचे सपोनि गौतम तायडे, पो कॉ. देविदास पळसे, हनुमंत अडसुळ, डीगंबर भोरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात नेण्यात मदत केली. यानंतर बस चालक सचिन विष्णू राऊत यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी कर्जत विभाग विवेकानंद वाखारे, जामखेड पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी भेट दिली आहे. याबाबत सध्या जामखेड पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

COMMENTS