Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अमरावतीमध्ये अपघातात तिघांचा मृत्यू

अमरावती ः अमरावती मधून सोमवारी सकाळी सव्वा पाच वाजता निघालेली चावला कंपनीची खासगी बस ओव्हर स्पीडच्या नादामध्ये नाल्यात कोसळली. या अपघातात तिघांचा

गुजरातमधील अरवली जिल्ह्यात भीषण अपघात
आषाढी वारी करुन परतत असताना वारकऱ्यांच्या गाडीला जबर अपघात .
मुंबई- पुणे हायवेवर अपघातात तिघांचा दुर्देवी मृत्यू

अमरावती ः अमरावती मधून सोमवारी सकाळी सव्वा पाच वाजता निघालेली चावला कंपनीची खासगी बस ओव्हर स्पीडच्या नादामध्ये नाल्यात कोसळली. या अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या बस मध्ये मेळघाटातील विविध शाळांमधील कार्यरत शिक्षक प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघात येथील जखमींवर धारणी तसेच परतवाडा येथील शासकीय रुग्णांमध्ये उपचार सुरू आहेत. अमरावती जिल्ह्यातील परतवाडा धारणी रोडवर सेमाडोहजवळ खासगी बसला भीषण अपघात झाला. या संदर्भात पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी सांगितले की, अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. मेळघाटातील वळण रस्त्यावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस लगतच्या पुलाखाली कोसळली. या अपघातात 50 प्रवासी जखमी झाले असून काहींची प्रकृती चिंताजनक आहे. सर्व जखमी प्रवाशांवर जवळच्या सेमाडोह प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. जखमी आणि मृतदेह बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफची टीम घटनास्थळी रवाना झाली आहे.

COMMENTS