Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील अपघातात तिघांचा मृत्यू

मुंबई : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर रविवारी दुपारी 1.15 च्या सुमारास एका कारचा भीषण अपघात झाला. या भीषण अपघात कार मधील तिघे हे जागीच ठार

नगर-मनमाड रोडवरील अपघातात दोघांचा मृत्यू
मोठी दुर्घटना ! ‘भगत की कोठी’ ट्रेनची मालगाडीला मागून धडक.
भीषण अपघातात माय-लेकाचा जागीच मृत्यू

मुंबई : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर रविवारी दुपारी 1.15 च्या सुमारास एका कारचा भीषण अपघात झाला. या भीषण अपघात कार मधील तिघे हे जागीच ठार झाले तर चौघे जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात चारोटी जवळील श्री महालक्ष्मी मंदिरा जवळील पुलावर झाला. झालेल्या अपघातात तीन प्रवासी ठार तर चार प्रवासी जखमी झाले आहे.
खड्डा चुकविण्याच्या नादात हा अपघात झाल्याने रस्त्यावरील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या भीषण अपघातात नरोत्तम छना राठोड (वय 65), केतन नरोत्तम राठोड (वय 32), आर्वी दीपेश राठोड (वय 01) या तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर, दीपेश नरोत्तम राठोड (वय 35), तेजल दीपेश राठोड (वय 32), मधु नरोत्तम राठोड (वय 58), स्नेहल दीपेश राठोड (वय 2.5) हे चौघे गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नालासोपारा पश्‍चिम येथे राहणारे राठोड कुटुंबीय हे भिलाड (गुजरात) येथे आज राष्ट्रीय महामार्गाने जात होते. यावेळी त्यांची कार ही दुपारी 1.15 च्या सुमारास राष्ट्रीय महामार्गाच्या गुजरातकडे जाणार्‍या मार्गीकेवर श्री महालक्ष्मी मंदिराच्या जवळ आली असता या ठिकाणी रस्त्यावर असलेला एक खड्डा चुकवण्याच्या नादात गाडी चालक दीपक राठोड यांचा अंदाज चुकला. यामुले त्यांची कार ही समोर असलेल्या कंटेनरला मागच्या बाजूने जोरात धडकली. ही धडक एवढी जोरात होती की, या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर, चौघे जण गंभीर जखमी झाले. जखमींपैकी दोघेजण गंभीर आहेत.

COMMENTS