पुणे ः अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलला पळून जाण्यासाठी मदत करणार्या विनय अर्हानासह तिघांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांनी 30 ऑक

पुणे ः अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलला पळून जाण्यासाठी मदत करणार्या विनय अर्हानासह तिघांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांनी 30 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. भूषण अनिल पाटील (वय 34), अभिषेक विलास बलकवडे (वय 31, रा. दोघेही नाशिक) आणि विनय विवेक अर्हाना (वय 50) अशी पोलीस कोठडी सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
अमली पदार्थ तस्करी आणि ललित पाटील ससून रुग्णालयातून फरार झाल्याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आहे आहेत. भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे यांना अमली पदार्थ तस्करीच्या गुन्ह्यातून ललित पाटील फरार झाल्याप्रकरणी गुन्ह्यात वर्ग करण्यात आले आहे. दुसरीकडे सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) कारवाई केलेल्या विनय अर्हाना याला बुधवारी तळोजा कारागृहामधून पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तिघांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. यापूर्वी दत्तात्रय डोके आणि अर्चना निकम यांना अटक करण्यात आली आहे. ललित पाटील हा ससून रुग्णालयाच्या वार्ड क्र 16 मध्ये उपचार घेत असताना भूषण पाटीलने 29 सप्टेंबर रोजी, तर अभिषेक बलकवडे याने 30 सप्टेंबर रोजी भेट घेतली होती. या दोघांनी कट रचून ललित पाटीलला पळविले असल्याचे तपासी अधिकार्यांनी न्यायालयात सांगितले. दरम्यान, ललित पाटील ससून रुग्णालयात उपचार घेत असताना विनय अर्हाना याच्याशी त्याची ओळख झाली होती.
COMMENTS