Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबई- पुणे हायवेवर अपघातात तिघांचा दुर्देवी मृत्यू

मुंबई प्रतिनिधी - सणासुदीच्या वेळी लोणावळा - खंडाळा दरम्यान मुंबई पुणे हायवेवर भरधाव कंटेनरची धडक बसून दोन दुचाकींचा अपघात झाला. या अपघातात ति

आसाममधील गुवाहाटी मध्ये रस्ता अपघातात ७ इंजिनियर विद्यार्थ्यांचा मृत्यू
कंटेनरला ओव्हरटेक करताना धक्का लागून दोघे चिरडले
रुग्णालयात भरती पतीच्या भेटीस जाणार्‍या वृद्ध महिलेचा बसच्या धडकेत मृत्यू

मुंबई प्रतिनिधी – सणासुदीच्या वेळी लोणावळा – खंडाळा दरम्यान मुंबई पुणे हायवेवर भरधाव कंटेनरची धडक बसून दोन दुचाकींचा अपघात झाला. या अपघातात तिघांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली आहे. या अपघातात एक महिला एक पुरुष आणि एका मुलीचा मृत्यू झाला. फरियाज हॉटेल जवळ भरधाव कंटेनरने एका दुचाकीला जबर धडक दिली .कंटेनरच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे .

दुपारी 3 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला मुंबई -पुणे राष्ट्रीय महामार्गावर फरियाज हॉटेल जवळ वळणावर भरधाव कंटेनर ने दोन दुचाकींना धडक दिली या अपघातात तिघांचा मृत्यू झाला तर तिघे जखमी झाले  या घटनास्थळी उतार आणि वळणावर अतिवेगाने वाहन चालवण्यामुळे कंटेनरच्या चालकाचे वाहनावर नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला 

COMMENTS