Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

देवदर्शन करुन परत येत असताना अपघात, तिघांचा मृत्यू

नागपुरात अपघाताची भीषण घटना घडली आहे. रामटेकगड येथून देवदर्शन आणि पर्यटन करून भंडाऱ्याकडे निघालेल्या एका कुटुंबाच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. य

समृद्धी महामार्गावरील अपघातात दोघे जखमी
दुचाकीस्वार गाडी घेऊन थेट खड्ड्यात.
एक्स्प्रेस वेवरील अपघातात सहा जणांचा मृत्यू

नागपुरात अपघाताची भीषण घटना घडली आहे. रामटेकगड येथून देवदर्शन आणि पर्यटन करून भंडाऱ्याकडे निघालेल्या एका कुटुंबाच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. तर ८ जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रामटेकगड येथून देवदर्शन आणि पर्यटन करून भंडाऱ्याकडे निघालेल्या कारचा भीषण अपघात झाला आहे. भरधाव कारने उभ्या ट्रकला मागून धडक दिल्याने कारमधील तिघांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. तर ८ जण या अपघातात जखमी झाले आहेत. तर यामध्ये तीन लहान मुलांचा देखील समावेश आहे. भंडारा जिल्ह्यातील रहिवासी राजेश भेंडारकर आपल्या कुटुंबातील काही सदस्यांसह नागपूर जिल्ह्यातील रामटेक दर्शनासाठी आले होते. रामटेक गडमंदिर येथे दर्शन करून ते आपल्या गावी परतत असताना रामटेक-भंडारा मार्गावर असलेल्या आरोली खंडाळा गावाजवळ उभा असलेल्या कंटेनर ट्रकला त्यांची कार धडकली.

अपघात इतका भीषण होता की समोरच्या सीटवर बसलेला चालक आणि महिला जखमी अवस्थेत कारमध्ये अडकून पडली होती. अपघातातील जखमींना उपचारासाठी रामटेकच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याचबरोबर परसराम भेंडारकर यांच्यासह दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर उर्वरित जखमींवर नागपुरात उपचार सुरू आहेत.

COMMENTS