पुणे : राज्यात ऐन दिवाळीत थंडीऐवजी पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. आज बुधवारपासून पुढील तीन दिवस पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
पुणे : राज्यात ऐन दिवाळीत थंडीऐवजी पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. आज बुधवारपासून पुढील तीन दिवस पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार 30 तारखेला रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर शहर व घाट परिसर, सातारा व घाट परिसर, संभाजीनगर, जालना परभणी, हिंगोली, नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ, जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वार्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
तर 31 तारखेला रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर शहर व घाट परिसर, सातारा व घाट परिसर, सांगली, सोलापूर, संभाजी नगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धारशिव, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ, जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वार्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर 1 नोव्हेंबरला, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर शहर व घाट परिसर, सातारा व घाट परिसर, सांगली, सोलापूर, संभाजी नगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, बीड जिल्ह्यात वादळी वार्यासाह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
COMMENTS