Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पवित्र हज यात्रेकरूंसाठी तीन दिवसीय मोफत हिजामा शिबिर

लाभ घेण्याचे डॉ. शेख एजाज यांचे आवाहन

बीड प्रतिनिधी - शहरातील बशीरगंज ते जिल्हा रुग्णालय रस्त्यावर न्यू सुंदर मेडिकल शेजारी असलेले युनिक नॅचरोपॅथी अँड कपिंग थेरपी क्लिनिक मध्ये दिनां

श्री साईबाबांच्या चरणी नऊ दिवसांत 18 कोटींची देगणी
हत्या करणाऱ्या आरोपीला टोपीच्या सहाय्याने २२ तासात पोलिसांनी केले गजाआड | LOK News 24
मलायकाने शेअर केला अर्जुनचा न्यूड फोटो

बीड प्रतिनिधी – शहरातील बशीरगंज ते जिल्हा रुग्णालय रस्त्यावर न्यू सुंदर मेडिकल शेजारी असलेले युनिक नॅचरोपॅथी अँड कपिंग थेरपी क्लिनिक मध्ये दिनांक 17 ते 19 जून शनिवार ते सोमवार असे तीन दिवसीय मोफत हिजामा (सुन्नत मधील दोन महत्त्वाचे पॉईंट) शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हज यात्रेकरूंनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. शेख एजाज यांनी केले आहे.
इस्लाम धर्मातील सर्वात पवित्र अशी हज यात्रा सुरू झाली असून इस्लाम धर्मातील एक फर्ज असलेले हज करण्यासाठी इस्लाम धर्माचे अनेक नशीबवान अनुयायी जाणार आहेत. या यात्रेपूर्वी इस्लाम धर्माचे अंतिम पैगंबर मुहम्मद मुस्तफा सल्ललाहु अलैही व सल्लम सुद्धा हिजामा करत होते. ही बाब लक्षात घेऊन सध्या हजला जाणारे अनेक हज यात्रेकरूंसाठी डॉ. शेख एजाज यांनी याच हिजामा कपिंग थेरपी चे मोफत आयोजन केलेले आहे. तीन दिवसीय मोफत हिजामा कपिंग थेरपी शिबीर दिनांक 17 ते 19 जून शनिवार ते सोमवार पर्यंत ठेवण्यात आलेले आहे. याचा लाभ हज यात्रेकरूंनी मोठ्या प्रमाणात घ्यावा असे आवाहन डॉ. शेख एजाज कपिंग थेरपीस्ट यांनी केले आहे.

COMMENTS