Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गांजा, अफूची विक्री करणार्‍या महिलेसह तिघे अटकेत

पुणे : शहरात अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी आलेल्या एका महिलेसह तिघांना गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. हडपसर आणि मार्केट

बंदी उठवल्याने नगरमध्ये बैलगाडाप्रेमींचा जल्लोष
देणगी दर्शन रांगेचे फेर नियोजन
दस्त नोंदणीसाठी सुटीच्या दिवशीही निबंधक कार्यालये सुरु राहणार

पुणे : शहरात अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी आलेल्या एका महिलेसह तिघांना गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. हडपसर आणि मार्केट यार्ड भागात ही कारवाई करण्यात आली. आरोपींकडून 25 किलो गांजा, पाच लाखांची 250 ग्रॅम अफू जप्त करण्यात आली.
या प्रकरणी एका महिलेसह लक्ष्मण गवनेर काळे (वय 55, रा. सोलापूर), तुलछाराम गीगाराम चौधरी (वय 39, रा. बिबवेवाडी, मूळ रा, राजस्थान) यांना अटक करण्यात आली. गुुन्हे शाखेचे अमली पदार्थ विरोधी गस्त घालत होते. त्या वेळी हडपसर गाडीतळ परिसरात एक महिला अमली पदार्थ विक्रीसाठी आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले. तिच्याकडून 13 किलो गांजा जप्त करण्यात आला. काळे याच्याकडून 12 किलो गांजा जप्त करण्यात आला. मार्केट यार्ड परिसरात अफू विक्रीसाठी आलेल्या चौधरीला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून पाच लाख रुपयांची 250 ग्रॅम अफू जप्त करण्यात आली. पोलिसांनी आरोपींकडून मोबाइल संच, अमली पदार्थ असा 11 लाख 22 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, शैलजा जानकर, विशाल दळवी, पांडुरंग पवार, सचिन माळवे आदींनी ही कारवाई केली.

COMMENTS