Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

फसवणूक प्रकरणी तिघे गजाआड

सिन्नर प्रतिनिधी/ सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहतीचे माजी चेअरमन दिलीप शिंदे यांची कर्जमंजूर करण्याच्या बहाण्याने सुमारे सहा लाख रुपयांची फसव

Ahmednagar : नगरमध्ये किरकोळ वादातून दोन गटात हाणामारी | LOKNews24
धोनी खेळणार रविंद्र जडेजाच्या नेतृत्त्वात;भिडणार श्रेयस अय्यर सोबत
कोतुळ पूल गेला पाण्याखाली ! l पहा LokNews24 —————

सिन्नर प्रतिनिधी/ सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहतीचे माजी चेअरमन दिलीप शिंदे यांची कर्जमंजूर करण्याच्या बहाण्याने सुमारे सहा लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी तीन संशयितांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. सर्वेश मनोज शिंदे (33), मनोज वामन शिंदे (63) दोघे रा. हृषिकेश हाईट, महात्मानगर, नाशिक व युवराज हरीशकुमार वर्मा (40) रा. अंधेरी पूर्व, मुंबई अशी तीन संशयितांची नावे आहेत. शिंदे यांचे मुसळगाव येथील सहकारी औद्योगिक वसाहतीत गुलमोहर रेसिडेन्सी नावाचे हॉटेल आहे. तथापि, आरंभी नोटाबंदी, त्यानंतर राज्य शासनाचा महामार्गापासून 500 मीटर आतील बार बंदचा निर्णय व पुढच्या काळात कोरोना संकट आल्याने शिंदे यांच्या आर्थिक अडचणीत वाढ झाली. हॉटेलचे विस्तारीकरण करायचे असल्याने त्यांना कर्जाची गरज होती. त्याच काळात संशयित आरोपी यांनी फॉर्म्युन बुलियन फायनान्स लिमिटेड कंपनी अंधेरी मुंबई यांच्यामार्फत कर्ज देण्याचे कबूल केले व तसे मंजुरीचे पत्रही दिले. मात्र त्याबदल्यात सुमारे
सहा लाख रुपये घेतले. तथापि, शिंदे यांना कर्जाची रक्कम मिळाली नाही. पाठपुरावा केल्यानंतरही सर्वेश व मनोज शिंदे तसेच
युवराज वर्मा यांच्याकडून उडावाउडवीची उत्तरे मिळू लागली. शेवटी या प्रकरणात आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर दिलीपराव शिंदे यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दिली. शिंदे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिस निरीक्षक श्यामराव निकम, पोलिस कर्मचारी हारळे, चकोर आदींच्या पथकाने सर्वेश व मनोज शिंदे यांना नाशिकमधून तर युवराज वर्मा याला अंधेरी येथून अटक केली. तिघांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी दिली. पोलिस निरीक्षक निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

COMMENTS