Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बेकायदा गर्भपात करणार्‍या डॉक्टरसह तिघांवर गुन्हा

पुणे : राज्यात ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियान सुरू असताना निरा (ता. पुरंदर) येथील श्रीराम हॉस्पिटलमध्ये बेकायदा गर्भपात करणार्‍या डॉ. सचिन रणनवरे

कर्नाटकात ट्रक आणि कारचा भीषण अपघात
माझी वसुंधरा अभियांना मध्ये दहिवडी नगरपंचायत राज्यात दुसर्‍या क्रमांकाची झेप
भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांचा आमदार काळेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश

पुणे : राज्यात ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियान सुरू असताना निरा (ता. पुरंदर) येथील श्रीराम हॉस्पिटलमध्ये बेकायदा गर्भपात करणार्‍या डॉ. सचिन रणनवरे याच्यासह तिघांवर जेजुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गर्भपाताचे हे प्रकरण उघड झाल्याने आणखी एक कळी जन्माआधीच खुडली गेली.
या बाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ येल्लमपल्ली यांनी या बाबत जेजुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ‘मिळालेल्या माहितीच्या आधारावर आम्ही निरा येथील श्रीराम हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. पण, आम्ही पोचण्यापूर्वी रात्रीच गर्भपात करून रुग्णाला घरी सोडण्यात आले होते. संबंधित रुग्ण रुग्णालयात दाखल झाल्याची कोणतीही नोंद डॉक्टरांनी ठेवली नव्हती. त्यामुळे रुग्ण येथे आलाच नव्हता, अशा पद्धतीने सर्व व्यवस्था केली होती’, असे डॉ. येल्लमपल्ली यांनी सांगितले. श्रीराम हॉस्पिटलमधील सोनोग्राफी केंद्रावर गर्भपात करणार्‍या रुग्णाचे नाव दिसले नाही. त्यानंतर गर्भपात करणार्‍या रुग्णाबद्दल विचारले असता डॉ. रणनवरे यांनी कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले. गर्भपात करणार्‍या रुग्णाचा क्रमांक मिळाल्याने थेट त्याच्याशी मोबाईल फोनवर संपर्क साधण्यात आला. या संपूर्ण प्रकरणात गर्भलिंग निदान करणे आणि गर्भपात करण्यापर्यंतची व्यवस्था बरकडे नावाच्या एजंटमार्फत करण्यात येत असल्याचीही खळबळजनक माहिती पुढे आली. या भागात बेकायदा गर्भपात करणारे रॅकेट सक्रिय असल्याचे यावरून स्पष्ट होते, अशी माहिती आरोग्य खात्यातील अधिकार्‍यांनी दिली. गर्भलिंगनिदान करणार्‍या महिलेला पहिली मुलगी होती. त्यामुळे दुसर्‍या वेळी गर्भधारणा झाल्यानंतर गर्भलिंग निदान करण्यात आले. दुसरी मुलगी नको, हे गर्भपातामागचे मुख्य कारण असल्याचे उघड झाले आहे. गर्भपात झालेल्या महिलेला पोलिसांनी तातडीने ससून रुग्णालयात दाखल करून तिची सविस्तर तपासणी करणे आवश्यक आहे, असेही आरोग्य खात्यातील अधिकार्‍यांनी सांगितले.

COMMENTS