Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पळणारे तीन आरोपी पकडले…त्यांच्याकडे तीन गावठी कट्टे सापडले

जेरबंद दोघांकडून सहा जिवंत काड़तुसेही हस्तगत

अहमदनगर प्रतिनिधी - पोलिसांची चाहूल लागताच पळून जाण्याच्या प्रयत्नातील दोघांना पोलिसांनी पाठलाग करून पकडले व त्यांच्याकड़ून तीन गावठी कट्टे व सहा

BREAKING: तहसीलदार अर्चना पागिरे यांचा अपघात की हत्येचा प्रयत्न…???? पहा Lok News24
शहरटाकळीत मतदान जागृती अभियान उत्साहात
प्रहार संघटनेच्या पाठपुराव्यामुळे गरिबाला मिळाला निवारा

अहमदनगर प्रतिनिधी – पोलिसांची चाहूल लागताच पळून जाण्याच्या प्रयत्नातील दोघांना पोलिसांनी पाठलाग करून पकडले व त्यांच्याकड़ून तीन गावठी कट्टे व सहा जिवंत काडतुसे हस्तगत केली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने राहाता तालुक्यातील कोल्हार येथे ही कारवाई केली.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना कोल्हार येथे दोनजण गावठी कट्टे व जिवंत काडतुसे विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पोलिस पथकाला सूचना दिल्या पथकातील सहायक पोलिस निरीक्षक दिनकर मुंडे, उपनिरीक्षक सोपान गोरे, सहायक फौजदार भाऊसाहेब काळे, मनोहर शेजवळ, हेड कॉन्स्टेबल विजय वेठेकर, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, पोलिस नाईक शंकर चौधरी, रवि सोनटक्के, लक्ष्मण खोकले, संदीप दरदंले, कॉन्स्टेबल रणजीत जाधव व चालक पोलिस नाईक भरत बुधवंत यांच्या पथकाने गोसावी वस्ती (कोल्हार) येथील एका पत्र्याच्या शेडजवळ सापळा रचला. आरोपींना ताब्यात घेण्याच्या तयारीत असताना त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पथकातील अंमलदारांनी त्यांचा पाठलाग करुन त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे तीन गावठी बनावटीचे कट्टे व सहा जिवंत काडतुसे आढळून आली. कॉन्स्टेबल रणजीत जाधव यांच्या फिर्यादीवरून लोणी पोलिस ठाण्यात रवींद्र भाऊसाहेब थोरात (वय 30, रा. कुरणपूर, ता. श्रीरामपूर) व बाळासाहेब भीमराज थोरात (वय 59, रा. कोल्हार, ता. राहाता) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी थोरातविरुद्ध सात गुन्हे
आरोपी रवींद्र भाऊसाहेब थोरात हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुध्द नगर जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात दरोड्याची तयारी, सदोष मनुष्यवध, मोटर व्हेईकल व आर्म अ‍ॅक्टनुसार 7 गुन्हे दाखल आहेत. एमआयडीसी, सोनई, श्रीरामपूर शहर, लोणी, कोतवाली आदी पोलिस ठाण्यात हे गुन्हे दाखल आहेत.

COMMENTS