अहमदाबाद ः गुजरात राज्यातील अहमदाबाद येथील अनेक शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. एका अज्ञात व्यक्तीने ई-मेलवरून ही धमकी दिली

अहमदाबाद ः गुजरात राज्यातील अहमदाबाद येथील अनेक शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. एका अज्ञात व्यक्तीने ई-मेलवरून ही धमकी दिली आहे. या ईमेलनंतर पोलीस सतर्क झाले असून शाळांमध्ये शोधमोहीम राबवली जात आहे. यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सध्या तरी पोलीस पथकाला कोणतीही बॉम्बसदृश्य वस्तू सापडलेली नाही. बॉम्बशोधक पथकही घटनास्थळी हजर आहे. विद्यार्थी आणि पालकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन अहमदाबाद प्रशासनाने केले आहे.
COMMENTS