Homeताज्या बातम्यादेश

मेडिकव्हर रुग्णालय उडवण्याची धमकी

संभाजीनगर ः राज्यस्थान राज्यातील 50 हॉस्पीटल उडवून देण्याची धमकीचा प्रकार ताजा असतांना, असाच प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील उघडकीस आला आहे.

पनवेल महानगरपालिकेचे २२०० कोटींचे अंदाजपत्र मंजूर
 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दीक्षाभूमी येथे दिली भेट 
खेड्या-पाड्यात 10 हजारात चोरीच्या दुचाकींची विक्री; दोघांना पोलिस पथकाने उचलले

संभाजीनगर ः राज्यस्थान राज्यातील 50 हॉस्पीटल उडवून देण्याची धमकीचा प्रकार ताजा असतांना, असाच प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील उघडकीस आला आहे. एक दिवस उशीरा मेल पाहिल्याने सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास अडीच तास पोलिसांनी बॉम्बचा शोध घेतला. चिश्तिया चौकाजवळील मेडिकव्हर हॉस्पिटल बॉम्बने उडविण्याची धमकी देणारा एक मेल हॉस्पिटल प्रशासनाला प्राप्त झाला असून त्यात हॉस्पिटलमधील सर्वांना ठार मारले जाईल, अशी धमकी देण्यात आली आहे. मात्र हॉस्पिटलमध्ये काहीही आक्षेपार्ह वस्तू नसल्याचे निष्पन्न झाल्यावर सर्वांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला.

COMMENTS